Nashik Agriculture News: उत्पादन घटल्याने मका राहणार तेजीत; गेल्या वर्षाच्या तुलनेने दरात 20 टक्के वाढ

20 percent increase in maize prices compared to last year nashik news
20 percent increase in maize prices compared to last year nashik news
Updated on

Nashik Agriculture News : तालुक्यासह कसमादे परिसरात कांदा, फळ शेतीनंतर सर्वाधिक मक्याचे उत्पन्न घेतले जाते. गेल्या काही वर्षापासून खरीप हंगामात मका आघाडीवर राहिला आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे मात्र उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. उत्पादन घटल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा भावात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यापुढेही भाव स्थिर राहतील नव्हे, तर किंबहुना वाढू शकतील, असा अंदाज बाजारपेठ अभ्यासकांचा आहे. दरम्यान, येथील बाजारात तालुक्यासह बागलाण, नांदगाव, चाळीसगाव व साक्री भागातून मका मोठ्याप्रमाणावर विक्रीसाठी येत आहे. (20 percent increase in maize prices compared to last year nashik news)

कसमादेमध्ये सामान्य शेतकरी खरिपात मक्याचे उत्पन्न घेतात. यंदा लागवड झाली. पण पुरेसा पावसाअभावी मक्याची वाढ झाली नाही. अनेक शेतकऱ्यांनी जनावरांना चारा म्हणून अर्धवट पीक काढून घेतले. याचदरम्यान, चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी कांदा लागवडीकडे वळाले.

एरव्ही दसरा ते दिवाळी या कालावधीत मका मोठ्याप्रमाणावर बाजारात विक्रीसाठी येतो. यंदा उत्पादन घटल्याने २४ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ५६ हजार २८९ क्विंटल मका विक्रीसाठी आला. बाजारभाव क्विटंलला एक हजार ८५० पासून ते २ हजार ३११ आणि सरासरी २ हजार १२५ रुपये होता.

दिवाळीची सुटी संपल्याने मजूर कामावर परतले आहेत. मका काढणीचे काम जोरात सुरू आहे. परिणामी, सध्या बाजारात आवक वाढली आहे. शनिवारी (ता. २५) ४०० ट्रॅक्टरमधून मका विक्रीसाठी आला होता. ओला मका १ हजार ९०० ते २ हजार १०० आणि वाळलेला मका २ हजार १५० ते २ हजार २५०, सरासरी दोन हजार रुपये क्विंटल भावाने विकला गेला. येथील बाजारात फेब्रुवारी अखेरपर्यंत खरिपातील मका विक्रीसाठी येतो.

20 percent increase in maize prices compared to last year nashik news
Rabi Season: दुष्काळाच्या दृष्टचक्रात रब्बीचाही झाला खेळ! येवल्यात 10 हजार हेक्टरची होणार घट

उत्पादन कमी असल्याने यंदा डिसेंबरअखेर अथवा जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत मक्याची आवक राहण्याची शक्यता आहे. तालुक्यातील शिवारात काही व्यापारी मका खरेदी करत आहेत. येथील बाजारात एप्रिल-मेमध्ये बिहार, उत्तरप्रदेशमधील मका येत असतो. घाऊक व्यापारी परराज्यातील मका पोल्ट्री खाद्य कारखाने व इतरांना पुरवतात.

"शेतकरी बांधवांनी बाजार समिती आवारात मका विक्रीसाठी आणावा. शिवारात मका विक्री करू नये. त्यातून फसवणूक होण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांना बाजार समिती आवारात विक्री केलेल्या मक्याचे तत्काळ पैसे दिले जात आहेत. सुकवून मका विक्रीसाठी आणल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल." - विनोद चव्हाण, उपसभापती, मालेगाव बाजार समिती.

"दुष्काळी परिस्थितीमुळे ४० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पन्न घटले. मालेगाव बाजार समितीत चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांना रोख पैसे अदा केले जातात. कसमादेसह चाळीसगाव व साक्री भागातून मका विक्रीसाठी येत आहे. या भागातील मक्याची आणखी एक ते दीड महिना आवक राहील. भाव तेजीत राहतील." - भिका कोतकर, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, मालेगाव.

20 percent increase in maize prices compared to last year nashik news
Nashik Agriculture News : पिकांच्या डिजिटल सर्वेक्षणासाठी देवळ्याची निवड : श्रीरंग तांबे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.