Nashik News : द्राक्षांचे यंदा 3 वर्षांच्या तुलनेत 20 टक्के अधिक उत्पादन; फेब्रुवारीपासून हंगाम रुळावर

black grapes
black grapes esakal
Updated on

नाशिक : पावसाने यंदाच्या द्राक्षांच्या छाटण्यांचे वेळापत्रक पंधरा दिवसांनी पुढे गेले. अशातच, थंडी रेंगाळली आहे. हा अपवाद वगळता सूर्यप्रकाश चांगला मिळाल्याने गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांनी अधिक द्राक्षांचे उत्पादन मिळण्याचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले.

छाटण्यांना विलंब झाल्याने पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यांपासून द्राक्षांचा हंगाम रुळावर येण्यास मदत होणार आहे. (20 percent more production of grapes this year compared to 3 years Season on track from February Nashik News)

थंडीमुळे मण्यांमध्ये साखर उतरण्याचे प्रमाण काहीसे मंदावले आहे. त्यामुळे कमी साखरेचे प्रमाण असलेली द्राक्षे निर्यात करू नयेत, यासाठी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेतला आहे. त्यासंबंधाने कृषी विभागाला साखरेचे प्रमाण तपासणीची विनंती संघाने केली आहे.

द्राक्ष निर्यातदारांची यासंबंधाने बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, की द्राक्ष पंढरी नाशिक जिल्ह्यात पावणेदोन लाख, तर राज्यात जवळपास चार लाख एकरावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते.

सध्यस्थितीत द्राक्षांची काढणी सुरु असून निर्यात सुरु झाली आहे. मात्र निर्यातीसाठी सातत्यपूर्ण द्राक्षांचे पॅकिंग होत नसल्याने निर्यातीचा वेग काहीसा कमी आहे.

black grapes
Nashik News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिऱ्हाड आंदोलन पालकमंत्री, सहकारमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर मागे!

युरोपमधील निर्यात जमेची बाजू

युरोपमध्ये जानेवारीच्या मध्यापर्यंत द्राक्षांची निर्यातीला वेग आला नव्हता. आता मात्र युरोपमध्ये द्राक्षांची निर्यात होत असून किलोला सर्वसाधारणपणे १०५ रुपये भाव मिळत आहे. याशिवाय रशियामध्ये गेल्यावर्षी किलोला ८० ते ८५ रुपये भाव मिळाला होता.

आता ९० ते ९५ रुपये किलो असा भाव मिळतो आहे. दुबईसाठी व्यापारी द्राक्षे खरेदी करताहेत. रंगीत वाणाला १२५ ते १३५ आणि ‘व्हाइट' वाणाला १०० रुपयांपर्यंत भाव व्यापारी देताहेत. स्थानिक बाजारात किलोला ‘व्हाइट' वाणाला ७० ते ८० आणि रंगीत वाणाला शंभर रुपयांच्यापुढे भाव मिळत आहे.

एकरी ५ हजाराचा खर्चाचा भुर्दंड

सूर्यप्रकाशाचा अभाव आणि ढगाळ वातावरणामुळे यंदा द्राक्ष बागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तिच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना एकरी पाच हजारांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. दरम्यान, पोंग्यामध्ये असलेल्या बागांचे पावसामुळे मध्यंतरी नुकसान झाले होते.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

black grapes
Nashik News: कापूस, सूतदर घसरल्याने यंत्रमाग उद्योगाला पुन्हा झळाळी; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती

द्राक्षांची निर्यात

(आकडे टनामध्ये)

० युरोपमध्ये ५३ कंटेनरमधून-६८४.४७८

० युरोपमधील देशनिहाय : नेदरलँड-६०३.७७, लतविया-२७.८५, रोमानिया-२६.८५, स्वीडन-२६

"कंटेनरचे भाडे कमी झाल्याने युरोपमध्ये द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे. मात्र नोव्हेंबर ते मे या कालावधीतील द्राक्ष हंगामात छाटण्या एकाचवेळी होऊन द्राक्षे एकाचवेळी मोठ्याप्रमाणात बाजारात येऊ नयेत यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यादृष्टीने शेतकरी तयार असतात. मात्र निसर्गाची साथ मिळत नसल्याने कमी कालावधीत अधिक द्राक्षे बाजारात येण्याची समस्या टाळता आलेली नाही." - विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी

"बांगलादेशमध्ये गेल्यावर्षी आयात कर किलोला ३८ ते ४० रुपये होता. तो आता ६० ते ६२ रुपयांपर्यंत पोचला आहे. हे शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठीची माहिती केंद्र सरकारपर्यंत पोचवण्यात आली आहे. केंद्र सरकारची मदत झाल्यास कराच्या रूपाने किलोला थेट बसणाऱ्या २२ ते २५ रुपयांचा फटका कमी होईल. त्यामुळे पुढील महिन्यापासून बांगलादेशसाठी द्राक्षे पाठवण्यास वेग येण्यास मदत होईल."

- कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

black grapes
रेल्वे स्टेशनवर बॉम्ब अन् प्रवाशांची बोंबाबोंब! मनमाडला Mockdrill, तब्बल सव्वातास धुमश्चक्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()