Nashik News : ZPचा 20 टक्के निधी अखर्चित; ग्रामीण पाणी पुरवठा, महिला बालकल्याण पिछाडीवर

ZP Nashik news
ZP Nashik newsesakal
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी खर्चासाठी धावपळ सुरू असली, तरी प्राप्त निधीपैकी ८० टक्के निधी खर्च झाला असल्याचे समोर आले, तर २० टक्के निधी अद्याप अखर्चित आहे.

यातही ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि महिला बालकल्याण विभागातंर्गत अंगणवाडी बांधकामचा निधी खर्चात पिछाडीवर आहे. (20 percent of ZP funds unspent Rural water supply women child welfare lagging behind Nashik News)

मार्चएण्डच्या पार्श्‍वभूमीवर, जिल्हा परिषदेत निधी खर्चासाठी लगभग सुरू आहे. निधी वेळेत खर्च व्हावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी १५ मार्चची डेडलाईन विभागप्रमुखांना दिली आहे.

असे असले, तरी निधी खर्च करण्याचे प्रमाण अगदी संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. गत पंधरा दिवसांत केवळ दोन टक्के निधी खर्च झाला असल्याचे आकेडवारीवरून लक्षात येत आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या निधीपैकी ७९.८० टक्के निधी खर्च झाला आहे.

तर, २०.२० टक्के निधी खर्च झालेला नाही. यातही ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, कृषी आणि महिला बालकल्याण विभागातील खर्चाचे प्रमाण हे ७० टक्क्यांच्या आत आहे. बांधकाम विभाग एक व दोनचा ७५ टक्के निधी खर्च झाला असला, तरी बांधकाम विभाग तीनचे निधी खर्चाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

ZP Nashik news
Dada Bhuse News: जवान सापडत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार : पालकमंत्री दादा भुसे

प्राथमिक शिक्षण, ग्राम पंचायत, समाज कल्याण, पशु संवर्धन, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंधारण विभागाच्या निधी खर्चाचे प्रमाणही ७० टक्क्यांहून अधिक आहे. निधी खर्चासाठी ३१ मार्च अंतिम दिवस आहे. यात निधी खर्च व्हावा यासाठी लेखा व वित्त विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

ग्रामीण पाणी पुरवठासह बांधकामची मोठ-मोठी बीले असून, ती या आठवड्यात पडण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी तालुकानिहाय वित्त विभागाच्या बैठका घेत आढावा सुरू केला आहे.

ZP Nashik news
Soldier Missing : तब्बल 20 तासांच्या शोधकार्यानंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह हाती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()