नाशिक : राज्यात शिंदे व फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आमदारांनी केलेल्या मागणीनुसार पंचवटी व सिडको विभागात प्रत्येकी दोनशे खाटांचे दोन रुग्णालय तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. प्रत्येकी ५५ कोटी रुपयांचा खर्च रुग्णालयासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.
पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांनी पंचवटी विभागामध्ये, तर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे यांनी सिडकोतील कामगार वस्ती लक्षात घेऊन रुग्णालय उभारण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. (200 bedded hospital in Panchvati and cidco 2 proposals of NMC worth 55 crores Nashik News)
दोन्ही मागण्यांची दखल घेत पालकमंत्री भुसे यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेने प्रत्येकी दोनशे खाटांचे दोन रुग्णालयांचा प्रस्ताव तयार केला. यामध्ये एका रुग्णालयासाठी ५५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव राज्य शासनाला पाठवून त्या अनुषंगाने निधी प्राप्त होईल.
रुग्णालयासाठी पदे भरणार
रुग्णालयांचा प्रस्ताव सादर करताना शासनाच्या नियमांनुसार खाटांचे निकष आहे. दोन लाखापेक्षा कमी लोकसंख्या असल्यास १०० खाटांचे, तर दोन ते पाच लाख लोकसंख्या असल्यास दोनशे खाटांचे रुग्णालय होऊ शकते.
सिडको व पंचवटी विभागातील लोकसंख्या दोन लाखांच्या पुढे असल्याने त्याअनुषंगाने महापालिकेने खाटांची संख्या निश्चित केली आहे. रुग्णालयामध्ये २५ विशेषज्ञ, ३९ वैद्यकीय अधिकारी, २२४ स्टाफ नर्स, १८ तांत्रिक व २४ प्रशासकीय, १० एन्ट्री ऑपरेटर, साठ वॉर्ड बॉय, ४८ आया याप्रमाणे पदांची भरती केली जाणार आहे.
"आगामी सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून रुग्णालयाची आवश्यकता आहे. त्यासाठी मालेगाव स्टॅन्ड येथील महापालिकेच्या भांडाराची जागा उपलब्ध आहे. जलद गतीने रुग्णालयासाठी शासनाकडे पाठपुरावा करू." - ॲड. राहुल ढिकले, आमदार, पूर्व.
"सिडको विभागात रुग्णालयाची आवश्यकता आहे. त्याअनुषंगाने अनेक वर्षांपासून मागणी आमदार या नात्याने केली जात होती. आता त्या मागणीला यश मिळताना दिसत आहे. शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करू." - सीमा हिरे, आमदार, पश्चिम विधानसभा मतदारसंघ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.