Nashik News : उत्तर महाराष्ट्रात 200 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; पाच जिल्ह्यांत आठ महिन्यांतील दुर्दैवी चित्र

200 farmers committed suicide in 5 districts of Nashik division news
200 farmers committed suicide in 5 districts of Nashik division newsesakal
Updated on

Nashik News : खालावलेली मानसिकता, कौटुंबिक दारिद्र्य, शेतीवरील कर्ज, सावकारी कर्ज, नापिकी, दुष्काळ, अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान नाशिक विभागात येणाऱ्या पाच जिल्ह्यांत २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. (200 farmers committed suicide in 5 districts of Nashik division news)

उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या ५४ तालुक्यांत आठ महिन्यांत २०० शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याची कारणे जरी वेगवेगळी असली, तरी कर्ज आणि नापिकी ही मुख्य दोन कारणे समोर येत आहेत.

जानेवारी ते ऑगस्टदरम्यान अहमदनगर जिल्ह्यात ४८, जळगाव जिल्ह्यात १०४, नाशिक जिल्ह्यात आठ, धुळे जिल्ह्यात ३६, तर नंदुरबार जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी सरकार दप्तरी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

200 farmers committed suicide in 5 districts of Nashik division news
Maharashtra Drought News : जिल्ह्यात दुष्काळ, शेतकरी अडचणीत; भाजप नेत्यानेच केली 'ही' मागणी !

जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा मोठा असून, त्या खालोखाल अहमदनगर व धुळ्याचा नंबर लागतो. २०० पैकी आजपर्यंत ६५ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, १०३ शेतकऱ्यांची चौकशी अजून सुरू आहे.

३२ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. ६५ शेतकरी पात्र असून, अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अजूनही चौकशी सुरू आहे. त्यांना लाभ मिळण्यासाठी महसूल विभाग सध्या गतिमान कामे करताना दिसत आहे.

"आत्महत्या होऊ नये यासाठी सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांची कामे आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना गतिमान व्हाव्यात. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या अडचणींत भर पडत आहे. रोजच नवे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहते म्हणून शेतकऱ्यांच्या समस्या शाश्वत सुटल्या पाहिजेत." - राजाभाऊ गायधनी, शेतकरी, पळसे

200 farmers committed suicide in 5 districts of Nashik division news
Maharashtra Drought News : हक्काच्या पाण्यासाठी राजकारण्यांची आश्वासने ; पाण्याअभावी शेतकरी मात्र हतबल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.