Nashik News : नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २११ शाळांमध्ये तब्बल २२२ प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकावर अतिरिक्त तुकड्या सांभाळण्याची जबाबदारी असून अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी पालकांमधून होत आहे. (200 Vacant Posts of Teachers in Nandgaon Taluka Educational loss of students due to inadequate teachers Nashik News)
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २११ शाळा असून यामध्ये शिक्षक व अधिकारी यांची ७६५ पदे मंजूर असून तालुक्यात ५४३ पदावर शिक्षक कार्यरत आहेत. यात २२२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.
नांदगाव तालुक्यातील २०२३ या वर्षात ११२ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदली प्रक्रियेत तालुक्यात फक्त ६१ शिक्षक मिळाले. आता शाळा सुरु झाल्या शिक्षकांचा तुटवडा असल्याने प्राथमिक शालेय विद्यार्थ्यावर त्याचे परिणाम होत आहे.
शिक्षक नसल्याची ओरड गावागावतील शाळेतून होऊ लागली आहे. अपुऱ्या शिक्षकांमुळे शाळेतील एका शिक्षकावर दोन व त्यापेक्षा अधिक वर्ग सांभाळावे लागत आहे.
गेल्या तीन वर्षापासून तालुक्यात शिक्षकांची पूर्ण पदे भरली गेलेली नाही. पूर्ण शिक्षक नसल्याने अतिरिक्त ताण इतर शिक्षकांना सोसावा लागत आहे. अशी परिस्थिती असताना देखील अनेकदा शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
केंद्रप्रमुखांची सर्व पदे रिक्त
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणधिकारी १ पद असून प्रभारी अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी आहे. शिक्षण विस्तार अधिकारी ६ पदे मंजूर असताना केवळ दोनच अधिकारी तालुक्यात कार्यरत आहे. केंद्रप्रमुख १३ पदे आहे हे सर्व रिक्त आहे.
मुख्याध्यापक ३५ पदे आहेत पैकी १४ कार्यरत असून २१ पदे रिक्त आहे. पदवीधर शिक्षक ८५ पदे असून ५५ पदे रिक्त आहेत. उपशिक्षक ६२४ पदे आहेत, त्यापैकी ४९७ कार्यरत पदे भरलेली आहे. वरिष्ठ सहाय्यक १ पद आहे ते देखील रिक्त आहे .
"नांदगाव तालुक्यात शिक्षकांची व पर्यवेक्षकीय यंत्रणेची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. शासनाने सदर पदे लवकरात लवकर भरावीत म्हणजे अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे काम करता येईल व ग्रामस्थांच्या तक्रारीही दूर होतील. शिक्षण विभागाची जे अधिकारी कर्मचारी उपलब्ध आहे. त्यांच्यावर शिक्षणाचे नियोजन चालू आहे." - प्रमोद चिंचोले, प्रभारी गटशिक्षणधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.