नाशिक : शहरासह जिल्हाभरात सार्वजनिक ठिकाणांवर गर्दीत वाढ होते आहे. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (ता.२) दिवसभरात २०१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर २३८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. चार बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. सद्यःस्थितीत दोन हजार ४०२ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (201 corona positive patients reported in nashik district)
शुक्रवारी नाशिक महापालिका क्षेत्रात शंभराहून अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शहरात १०६ पॉझिटिव्हसह नाशिक ग्रामीणमध्ये ९३, जिल्हा बाहेरील दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली. मालेगाव क्षेत्रात एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची नोंद नाही. जिल्ह्यातील चार मृतांपैकी एक नाशिक महापालिका क्षेत्रातील तर उर्वरित तीन मृत नाशिक ग्रामीणमधील आहेत. यात बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील ४५ वर्षीय महिला, अंबासन येथील ६६ वर्षीय पुरुश बाधितांचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यातील ३६ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला. शहरात संत कबीर नगर येथील ५४ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार १९२ रुग्णांना अहवालाची प्रतिक्षा होती. नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ५८९, मालेगावच्या ३२९, नाशिक महापालिका क्षेत्रातील २७४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. दिवसभरात जिल्हाभरातील रुग्णालये व गृहविलगीकरणात ५९३ रुग्ण दाखल झाले. यातील नाशिक महापालिका क्षेत्रातील ५३९ रुग्ण आहेत. जिल्हा रुग्णालयात तीन, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात एक रुग्ण दाखल झाला.
(201 corona positive patients reported in nashik district)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.