नाशिक : हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पहाटेपासून शहर व परिसरात संततधार सुरु आहे. सकाळी साडेआठ ते साडेपाच पर्यत शहरात २०.३ मि.मी.पावसाची नोंद झाली. उद्याही पावसाचा अंदाज असून जोर कमी राहील, असा अंदाज आहे. संततधार पावसासोबत जिल्ह्यातील गंगापूर, पालखेड, दारणा, गिरणा यासह सगळ्याच धरण समुहातूनही विसर्ग सुरू आहे. (21 mm of rain recorded in Nashik Rain Update Latest Marathi News)
शहर- जिल्ह्यात काल (ता.१५) पासून तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला त्यानुसार काल मध्यरात्री पासून शहर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील सगळ्यात धरणात ९८ टक्केहून अधिक धरणसाठा झालेला असताना अजूनही पावसाचा जोर कायमच आहे. गुरुवारी रात्री नऊपासून सुरू असलेला विसर्ग आज सायंकाळी पाचपर्यंत कायम होता.
सायंकाळी सहानंतर गंगापूर धरणातील १,६०८ विसर्ग करण्यात आला. या शिवाय दारणा १०, ५६२, मुकणे १,४८६, कडवा ७, ६३२, वालदेवी ४०७, आळंदी ४४६, भोजापूर २,८००, नांदूरमध्यमेश्वर ३८,३४५, पालखेड समूहातून ६,८२४ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. चणकापूर धरणातून गिरणा नदीद्वारे ६,६०९ क्यूसेक, कादवा ५९४ तर हरणबारी ६,२२१, पुनंद ४,९२२ विसर्ग सुरू आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.