NMCत दिवाळीची धामधूम सुरू; कर्मचारी संघटनेकडून 21000 सानुग्रह अनुदानाची मागणी

NMC diwali festival news
NMC diwali festival newsesakal
Updated on

नाशिक : महापालिका मुख्यालयात दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फरकाची रक्कम देण्याचे महापालिकेने मान्य केल्यानंतर आता दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे. २१ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. (21000 Congratulatory Grant Demand from NMC Employees Union on diwali festival Nashik Latest Marathi News)

नाशिक महानगरपालिका मुन्सिपल कर्मचारी संघटनेचे प्रवीण तिदमे यांच्यासह सफाई कर्मचारी विकास युनियनचे सुरेश मारू, रमेश मकवाना यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. ऑक्टोबरअखेर दीपावली असून, त्यापूर्वी याच महिन्यात होणाऱ्या वेतनामध्ये सानुग्रह अनुदान जमा करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

NMC diwali festival news
आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या; चांदवड येथील वसतिगृहातील प्रकार

सफाई कर्मचाऱ्यांकडून निवेदन देताना सानुग्रह अनुदानासह सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना २१ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी आहे.

कोरोनाकाळात महापालिका कर्मचाऱ्यांनी जिवाची परवा न करता नागरिकांना सेवा दिली. कोरोनामुळे अनेक कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. मनुष्यबळाचा अभाव असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असूनही सेवा दिली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेता २१ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

NMC diwali festival news
Nashik : मुल्हेर किल्ल्यावर शिवप्रसाद- रामप्रसाद तोफा विराजमान; सौंदर्यात भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()