नाशिक : जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर ५०’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी शनिवारी (ता.१२) जिल्ह्यातील १५ तालुका केंद्रावर चाचणी परिक्षा झाली. यात नोंदणी झालेल्या ३ हजार २२९ विद्यार्थ्यांपैकी २ हजार १७० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. तर १ हजार ५९ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती- जमाती या प्रवर्गातील २०२२-२३ मध्ये अनुदानित, अंशतः: अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाचे उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत प्रवेशीत निवडक विद्यार्थ्यांकरिता सीईटी/जेईई या व्यावसायिक प्रवेश परीक्षेकरीता सुपर ५० या नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. (2170 students appeared for examination under Super 50 initiative Nashik News)
या नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत निवड प्रवेशपूर्व परीक्षेकरीता पात्र विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीत २ हजार ९८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. शनिवारी ऐनवेळी २४१ विद्यार्थी यांनी नोंदणी करत सहभाग घेतला. त्यामुळे एकूण ३ हजार २२९ विद्यार्थ्यांची एकूण नोंदणी झाली. यातील २ हजार १७० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. सकाळी ११ ते १ वाजे दरम्यान जिल्हाभरात निश्चित करण्यात आलेल्या ११३ केंद्रांवर ही परिक्षा शांततेत पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केंद्रांना भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
परीक्षार्थी तालुकानिहाय विद्यार्थी
नाशिक (२१७), मालेगाव (४०), दिंडोरी (१६०), इगतपुरी (१३५०, त्र्यंबकेश्वर (१४४), सिन्नर (३५) , येवला (६२) , सटाणा ( १२७), निफाड (१५५), देवळा (९२), चांदवड (४६), कळवण (२९८), सुरगाणा (३०२), नांदगाव (५२), पेठ (३०५). एकूण २ हजार १७०.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.