Nashik News : येवल्यात 22 किलो प्लास्टिक जप्त; नगरपालिकेकडून प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई

Municipal sanitation inspector Sagar Zawre during the plastic confiscation campaign.
Municipal sanitation inspector Sagar Zawre during the plastic confiscation campaign.esakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : येवला नगरपरिषदेने प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई करुन मोठ्या प्रमाणात सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले.

नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्यधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. (22 kg plastic seized in Yeola Action taken by municipality regarding plastic ban Nashik News)

राज्यात प्लास्टिक बंदी असताना देखील येवल्यात मात्र सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिका प्रशासनातर्फे सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकान मालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

यापूर्वीही अनेक दुकानातून प्लास्टिक जप्ती करण्यात आली. तसेच दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. तरीही काही विक्रेते प्लास्टिक वापरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Municipal sanitation inspector Sagar Zawre during the plastic confiscation campaign.
Nashik News : दिंडोरीतील 750 वर्षांपूर्वीच्या त्रिनेत्र गणेशमूर्तीचे संवर्धन; मूर्तीला आतून बळकटी

येवला शहरातील नांदगाव रोड येथील महाराष्ट्र मसाला येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असल्याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाच्या पथकाने मुख्याधिकारी श्री. मुतकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक सागर झावरे यांनी मौलाना शोएब कुरेशी यांच्या मालकीच्या अल कुरेश डिस्पोजल या दुकानात छापा टाकला.

त्या ठिकाणी अंदाजे २२ किलोहुन अधिकचे प्लास्टिक पालिका प्रशासनाच्या पथकाद्वारे जप्त करण्यात आले. यापुढेही शहरात कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे. त्यामुळे कोणीही प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन श्री. झावरे यांनी केले आहे.

Municipal sanitation inspector Sagar Zawre during the plastic confiscation campaign.
Nashik Child Marriage Crime : निनावी कॉलने रोखला बालविवाह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.