Nashik News: ‘बिऱ्हाड’ आंदोलकांना घरी पोहोचविण्यासाठी 22 लाख खर्च; बसद्वारे रवानगी

22 lakh rupees were spent to send berhad marchers back from Nashik news
22 lakh rupees were spent to send berhad marchers back from Nashik news
Updated on

Nashik News : मागण्यांचे बिऱ्हाड घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चेकऱ्यांना नाशिकमधूनच परत पाठविण्यासाठी २२ लाख रुपये खर्च आला आहे. एसटी महामंडळाने उपलब्ध केलेल्या बसचे भाडे आता कसे द्यायचे, असा पेच जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. (22 lakh rupees were spent to send berhad marchers back from Nashik news)

बारा दिवसांपूर्वी नंदुरबारहून चालत आलेले बिऱ्हाड मोर्चातील आदिवासी बांधव मंगळवारी (ता. १९) पहाटे आपल्या गावी सुखरूप परतले. जिल्हा प्रशासनाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या मदतीने या आंदोलकांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची जबाबदारी पार पाडली. शेवटचाआदिवासी बांधव बसमधून मार्गस्थ होईपर्यंत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठक्कर बझार बसस्थानकात अक्षरशः रात्र जागून काढली.

गावी पोहोचविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी आंदोलकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्याशी समन्वय साधून बसची व्यवस्था उपलब्ध केली.

22 lakh rupees were spent to send berhad marchers back from Nashik news
Viksit Bharat Sankalp Yatra: विकसित भारत संकल्प यात्रा रोखल्यास गुन्हे दाखल करा : जलज शर्मा यांचे निर्देश

महामंडळाच्या ४५ बस नऊ मार्गांवर सोडण्यात आल्या. यातून तीन हजार प्रवासी वाहतूक करण्यात आली. सिया यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार शोभा पुजारी, परमेश्वर कासुळे आदी मध्यरात्रीपर्यंत बसस्थानकावर थांबून होते.

मार्ग सोडलेल्या बस

नंदुरबार १४

धुळे ८

नवापूर ५

खांडबारा ५

निजामपूर ४

दहिवेल ३

पिंपळनेर ३

साक्री २

कन्नड १

एकूण ४५

22 lakh rupees were spent to send berhad marchers back from Nashik news
Nashik News: सिन्नरमधील खरेदीप्रकरणी शासनाची केली फसवणूक : आमदार कांदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.