नाशिक : कोरोनामुळे दिलासा मिळत असला या आजाराशी साध्यर्म असलेल्या स्वाइन फ्लूने मात्र शहरात थैमान घालण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत शहर व ग्रामीण भाग मिळवून २२ जणांचा स्वाइन फ्लूने बळी गेला असून, बाधितांची संख्या १४४ वर पोचली आहे. स्वाइन फ्लूमुळे मृत झालेल्या व्यक्तींचा आकडा वाढत असल्याने वैद्यकीय विभागाने मृतांच्या आकडेवारीचे विभाजन करताना शहरात फक्त आठ मृत्यू झाल्याचा दावा केला आहे, तर जिल्हा बाह्य मृतांची संख्या नऊ व ग्रामीण भागातील मृतांची संख्या पाच असल्याचे जाहीर केले. (22 Swine Flu Patients Died so far Nashik Latest Marathi News )
पावसाची संततधार व सूर्याचे दर्शन होत नसल्याने साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव सध्या जाणवत नसला तरी या आजाराशी साधर्म्य असलेल्या मात्र गेल्या पंधरा दिवसापासून थैमान घालण्यास सुरवात केली आहे. जून महिन्यात दोन, जुलै महिन्यात २८, ऑगस्ट महिन्यात १०२, तर सप्टेंबरमध्ये १२ असे एकूण १४४ स्वाइन फ्लू रुग्ण शहरात आढळून आले आहेत.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील स्वाइन फ्लूचा आकडा वाढत आहे. सध्या ग्रामीण भागात ८१ हून अधिक रुग्ण उपचार घेत आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. स्वाइन फ्लूमुळे ऑगस्ट महिन्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर महिन्यात स्वाइन फ्लूमुळे दोन मृत्यूची नोंद झाली आहे. कामटवाडे येथील ५४ वर्षी महिला व मखमलाबाद रोडवरील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरातील ६५ वर्षी वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
शहरात उपचार घेत असलेल्या मात्र ग्रामीण भागातील कळवण, निफाड व नाशिक तालुक्यातील लाखलगाव भागातील प्रत्येकी एकाचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला. चांदवडमधील दोन जणांचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यातील एक, कोपरगाव येथील तीन, संगमनेरचे दोन, श्रीरामपूर एक, जळगावच्या बोदवड तालुक्यातील एक व वाशीम जिल्ह्यातील एकाचा नाशिकमध्ये मृत्यू झाला.
डेंगी बाधितांचा आकडा वाढला
पावसामुळे डेंगी आजाराचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आत्तापर्यंत डेंगीचे २३० रुग्ण शहरात आढळून आले आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत असून, १९ सप्टेंबरपर्यंत ५८ रुग्ण या महिन्यात आढळले. त्यामुळे अडगळीत साठणारे अस्वच्छ पाणी व पाण्याचे भांडे स्वच्छ करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.