Nashik: खात्यांतर्गत PSIच्या परीक्षेला 2218 जण हजर! उत्तर महाराष्ट्रातून सहभाग, सामान्यज्ञानाचे प्रश्‍न ठरले कठीण

PSI Exam
PSI Examesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य पोलिस दलातील खात्‍यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी रविवारी (ता. १०) येथे परीक्षा घेण्यात आली.

नाशिक शहरातील सहा केंद्रांवर पार पडलेल्‍या परीक्षेस उत्तर महाराष्ट्रातून दोन हजार २१८ परीक्षार्थी उपस्‍थित होते. दरम्‍यान, सामान्य ज्ञान विषयातील प्रश्‍न कठीण ठरल्‍याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले. (2218 appeared for PSI examination under department Participation from North Maharashtra General Knowledge questions proved difficult Nashik)

‘एमपीएससी’तर्फे जाहीर तारखेनुसार रविवारी राज्‍यस्‍तरावर पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्‍पर्धा पूर्व परीक्षा २०२३ घेण्यात आली. परीक्षेच्‍या पार्श्वभूमीवर जिल्‍हा प्रशासनातर्फे चोख व्‍यवस्‍था केलेली होती.

जिल्‍हा प्रशासनातर्फे १५८ अधिकारी, कर्मचारी तैनात होते. याशिवाय, परीक्षा केंद्रांबाहेर पोलिस बंदोबस्‍त ठेवण्यात आला होता. या परीक्षेसाठी नाशिक शहर-जिल्ह्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्‍ह्यांतून परीक्षार्थी उपस्‍थित होते.

परीक्षा झाल्‍यावर मित्रपरिवाराबरोबर चर्चा करताना अनेकांनी गुणांचा अंदाज घेतला. सामान्यज्ञान विषयाचे प्रश्‍न काही प्रमाणात अवघड होते, अशी प्रतिक्रिया काही परीक्षार्थ्यांनी व्‍यक्‍त केली.

PSI Exam
Nashik Educational: पाचवी अन् आठवीच्या वार्षिक परीक्षेसाठी 60 गुणांची परीक्षा! अनुत्तीर्ण झाल्यास पुन्हा त्याच वर्गात

उपस्‍थितीचा तपशील असा :

- परीक्षा केंद्रे : एकूण ६

- प्रवीष्ट झालेले : २ हजार ४५८

- परीक्षेला उपस्‍थित : २ हजार २१८

- परीक्षेला अनुपस्‍थित : २४०

PSI Exam
SAKAL Exclusive: शिक्षकांवर आता साक्षरता कार्यक्रमाचा भार! केंद्राच्या ‘उल्लास' ॲपवर मागवली माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.