MUHS Convocation Ceremony : आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 22वा दीक्षांत समारंभ 13 फेब्रुवारी रोजी

MUHS latest marathi news
MUHS latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 22 वा दीक्षान्त समारंभ सोमवार, दि. 13 फेब्रुवारी 2023 रोजी नाशिक येथे विद्यापीठ मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे. (22nd MUHS Convocation Ceremony of University of Health Sciences on 13th February nashik news)

विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी सांगितले की, विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन उपस्थितीत होणार आहे.

तसेच या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास आणि पंचायती राज, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री मा.नामदार श्री. गिरिष महाजन, नाशिक जिल्हयाचे मा. पालकमंत्री नामदार श्री. दादाजी भुसे विशेष निमंत्रित असतील तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय आरोग्य विज्ञान विद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भुषण पटवर्धन हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

MUHS latest marathi news
Indian Culture : जुन्या रूढी, परंपरा शहरासह ग्रामीण भागात परंपरा कायम; धावपळीच्या युगात पाचवी पूजनाचे महत्त्व टिकून

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, दीक्षात समारंभाचे आयोजन विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत सकाळी 11.00 वाजता करण्यात आले आहे. विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य, संलग्नित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाची नोंद घ्यावी.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MUHS latest marathi news
Dada Bhuse | बोरी अंबेदरी बंदिस्त जलवाहिनीमुळे लाभ क्षेत्रात शाश्वत सिंचन सुविधा : दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.