Nashik News : राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत येथील नगरपंचायतीसाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नगरपंचायतीने बैठक घेत मुख्यमंत्री ऐकनाथ शिंदे यांच्यासह शासनाचे आभार मानले.
बैठकीला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि निफाडकर उपस्थित होते. (23 crore approved for Niphad Nagar Panchayat city will be transformed through special plan Nashik News)
माणकेश्वर चौक, मामलेदार चौक, शनिचौक, मशीद चौक सुशोभीकरणासाठी २ कोटी रुपये, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरणासाठी १ कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरण व अभ्यासिका बांधणे, पिंपळगाव रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी १ कोटी,
प्रभाग तीनमधील बरड वस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करण्यासाठी १ कोटी, गट क्रमांक १०९७ मध्ये बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर बांधण्यासाठी ८ कोटी,
गट क्रमांक ११०७ मध्ये मटन मार्केट बांधकाम, बाजारपेठेत काँक्रिटीकरण करणे, ओटे बांधण्यासाठी ५ कोटी, तर नगरपंचायत नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निफाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी २३ कोटींचा भरभक्कम निधी दिला आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर विश्वास टाकला. त्यामुळे निफाड तालुक्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आजपर्यंत कोणत्याच शहराला मुख्यमंत्र्यांनी एवढा भरभरून निधी दिला नसेल, तेवढा निधी निफाड शहराला मिळाला. निफाड तालुक्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट करू." -अनिल कुंदे, उपनगराध्य, निफाड
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार व आदर्शावर वाटचाल करून पक्षवाढीसाठी कार्यरत राहू. २३ कोटी निधी मंजूर झाल्यामुळे निफाड शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे."
-राजेंद्र सोनवणे, सहसंपर्कप्रमुख, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.