Nashik News: प्रबोधनासाठी 24 तास ‘ऑन ड्यूटी’! पोलिस हवालदार सचिन जाधव यांनी जपले सामाजिक भान

Hawaldar Sachin Jadhav
Hawaldar Sachin Jadhavesakal
Updated on

विकास बाविस्कर

Nashik News : खाकीचे कर्तव्य जोपासत सामाजिक भान राखून समाज प्रबोधनाचे आगळेवेगळे काम नाशिक पोलिस दलातील एक कर्मचारी करीत आहे. केवळ शासकीय नोकरी म्हणून खाकी वर्दी घालून दिलेले काम करण्यापेक्षा त्यापलीकडे जाऊन समाजातील नवीन पिढी घडविण्यासाठी सचिन जाधव अहोरात्र मेहनत घेत आहेत.

श्री. जाधव हे अंबड पोलिस ठाण्यात कार्यरत असून, पोलिस खात्याची समाजातील असलेली प्रतिमा बदलण्याचे काम ते करीत आहेत. (24 hours on duty for enlightenment! Police Constable Sachin Jadhav maintained social consciousness Nashik News)

पोलिस असला तरी तो व्यक्ती एक माणूस असतो. नोकरीचा ताण असल्यामुळे कदाचित चिडचिड होत असेलही, मात्र समाजाच्या प्रत्येक घटकांशी नम्रपणे बोलून त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना योग्य तो मार्ग दाखवीत आहेत.

सचिन जाधव हे छत्रपती शिवरायांचे विचार नवीन पिढीला कळावे म्हणून पाथर्डी फाटा येथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर अखंड दिवा लावून शिवआरती करतात. संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून विविध शाळांना भेटी देत वाहतूक नियम, योगा, स्वयंशिस्त, स्वसंरक्षणाचे धडे देतात.

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्रात हजारो पोलिस बांधवांना वाहतूक व्यवस्थापन प्रशिक्षण, वाहतूक विभागातील बॉडीवॉर्न कॅमेरा, ब्रेथ एनालायझर मशिन, इ- चलन मशिन, टिंट मिटर, वाहतूक विभागातील वापरले जाणारे विविध साहित्य, वाहतुकीचे इशाऱ्यांबाबत मार्गदर्शन करतात.

शिवाय पोलिस स्टेशनला आलेल्या तक्रारदारांना समजून सांगणे, कौटुंबिक वाद मिटविणे, असे अनेक प्रकारचे कार्य सचिन जाधव यांचे सुरू आहे. विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवीत नागरिकांना आरोग्याचे धडेही ते देत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Hawaldar Sachin Jadhav
Dhule: गुणवत्ता नियंत्रणची विश्‍वासार्हताही कसोटीवर; बोगस कृषी निविष्टाप्रश्‍नी कृषी यंत्रणा दोषी की विक्रेते?

शिवगौरव पुरस्कार, कार्यक्रमात हेल्मेट भेट

सचिन जाधव यांच्या कार्याचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र सिंघल यांनी विशेष कौतुक केले. १९ फेब्रुवारी २०२३ ला त्यांना शिवराजे प्रतिष्ठानतर्फे शिवगौरव पुरस्कार देण्यात आला.

त्यांनी पाथर्डी फाटा येथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर तब्बल १००० दिवस अखंड दिवा सुरू ठेवत सामाजिक कार्य सुरू ठेवले. सचिन जाधव हे कोणत्या शुभकार्यात गेल्यानंतर त्या कुटुंबीयांसाठी भेटवस्तू म्हणून हेल्मेट देतात.

तर हेल्मेट वापरामुळे दुचाकीस्वारांना त्याचा काय उपयोग आहे, हेदेखील उदाहरणांसह स्पष्ट करून सांगतात. इतकेच नव्हेतर, त्यांच्या सोशल मीडियाच्या वापरातूनही वाहतूक नियम पालन करण्याचे आवाहन करीत असतात.

"नोकरी सांभाळून सुरू असलेल्या सामाजिक कामातून आनंद मिळतो. सामाजिक प्रबोधन करताना एकाने जरी वाहतूक नियमांचे पालन केले तरी मी यात माझे भाग्य समजेल. हळूहळू अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते माझ्यासोबत प्रबोधनात सहभाग घेत आहे. ही कामाची पावती म्हणावी लागेल."- सचिन जाधव, पोलिस कर्मचारी.

Hawaldar Sachin Jadhav
Nashik News: छत्रपती शिवाजी स्टेडियम पाडण्यापूर्वी नवीनचे भूमिपूजन! 25 कोटींतून क्रीडा संकुल उभारणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.