नाशिकमध्ये 'या' रुग्‍णालयांत 24 तास लसीकरण

vaccination in nashik
vaccination in nashikesakal
Updated on

नाशिक : कोरोनापासून (Corona virus) बचावासाठी लसीकरण (Vaccination) हाच प्रभावी पर्याय सध्यातरी उपलब्‍ध आहे. लसीकरणासाठी प्रोत्‍साहन देण्यासाठी सुयश हॉस्‍पिटलने अनोखा पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत नागरिकांना २४ तासांत कधीही रुग्‍णालयास भेट देत लस घेता येईल. शिवाय लसीकरण केलेल्‍यांना पुढील वर्षभरासाठी आरोग्‍य तपासणीत २५ टक्‍के सवलत दिली जाणार आहे. (24-hours-vaccination-in-hospital-nashik-corona-news)

कोरोना लसीकरणवाढीसाठी हॉस्‍पिटलचा पुढाकार

कोरोनाची संभाव्‍य तिसरी लाट (Corona third wave) लक्षात घेता, जास्‍तीत जास्‍त गतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे आवश्‍यक आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तरी नागरिकांना घरीच उपचार घेणे शक्‍य होईल व आरोग्‍य यंत्रणांवर ताण वाढणार नाही. यामुळे शासनाच्‍या लसीकरण मोहिमेस खासगी रुग्‍णालय बळ देत आहे. याचाच एक भाग म्‍हणून मुंबई नाका परिसरातील सुयश हॉस्‍पिटलमध्ये २४ तास लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे. त्‍यामुळे नोकरी, व्‍यवसायामुळे दिवसा वेळ नसलेल्‍या व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या सुविधेच्‍या वेळी लसीकरण करणे शक्‍य होईल व केंद्रावर गर्दीही टळेल. तसेच रुग्‍णालयात लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांना पुढील एका वर्षासाठी आरोग्‍य तपासणी पॅकेजमध्ये २५ टक्क्‍यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. यामुळे नागरिकांचा दुहेरी फायदा होईल.

vaccination in nashik
नाशिकमध्ये संसर्ग दर घटूनही निर्बंध ‘जैसे थे’

''नागरिकांच्‍या सुविधेसाठी लसीकरण केंद्र २४ तास खुले राहील. सध्या कोव्‍हॅक्‍सिन लस उपलब्‍ध असून, आठवडाभरात कोव्‍हिशील्‍डही उपलब्‍ध होईल. लसीकरणास प्रोत्‍साहन देण्यासाठी आम्‍ही आरोग्‍य तपासणी पॅकेजवर सवलत देत आहोत.'' -डॉ. हेमंत ओस्‍तवाल, संचालक, सुयश हॉस्‍पिटल

अशा आहेत किमती

शासनाने खासगी रुग्‍णालयांसाठी निर्धारित शुल्‍कात लस उपलब्‍ध असेल. कोव्‍हिशील्‍डकरिता 780 रुपये, तर कोव्‍हॅक्सिनसाठी 1190 रुपये आकारले जातील.

vaccination in nashik
सावधान! नाशिक शहरात दीड वर्षात 54 मुले बेपत्ता

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये २४ तास लसीकरण‍

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील लसीकरण केंद्र २४ तास सुरू राहणार आहे. लसीकरणासाठी कोल्‍डचेन व अन्‍य नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. यामुळे आतापर्यंत २२ हजारांहून अधिक नागरिकांनी येथून लसीकरण करून घेतले आहे. रुग्‍णालयात कोव्‍हॅक्सिन, कोव्हिशील्‍ड लशी उपलब्‍ध आहेत. येत्‍या तीन-चार दिवसांत स्‍पुटनिक-व्‍ही लसही उपलब्‍ध होणार आहे.

''गर्दी टाळत, सर्वांना सुविधेच्‍या वेळी लसीकरण करता यावे, यासाठी २४ तास केंद्र सुरू ठेवत आहोत. लशींची गुणवत्ता टिकविण्यासाठी कोल्‍डचेनची सुसज्‍ज व्‍यवस्‍था आहे. सोबत प्रशिक्षित कर्मचारी उपलब्‍ध आहेत. लवकरच स्‍पुटनिक-व्‍ही लसही उपलब्‍ध केली जाणार आहे.'' -डॉ. राज नगरकर, एमडी, एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर

(24-hours-vaccination-in-hospital-nashik-corona-news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()