Nashik Lumpy Disease : जिल्ह्यात लम्पीने 25 जनावरांचा मृत्यू

Lumpy Disease
Lumpy Disease esakal
Updated on

Nashik Lumpy Disease : जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून, आतापर्यंत २५ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून, दोन दिवसांत १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल, असा दावाही विभागातर्फे करण्यात आला आहे. ( 25 animals death by Lumpy disease in district nashik news)

जिल्ह्यात आठ लाख ९५ हजार ५० गोवंशीय पशुधन आहे. सध्या जिल्ह्यात ४९ ईपी सेंटरमधून ३१८ जनावरे बाधित झाली असून, त्यात ४१ जनावरांची प्रकृती गंभीर आहे.

त्यात सर्वाधिक गंभीर जनावरे येवला (१४), सिन्नर व निफाड प्रत्येकी (३), नांदगाव व दिंडोरी प्रत्येकी (२) आहेत. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक १५३, येवल्यात १३१, निफाडमध्ये ९७, नाशिकला ४६ लम्पीग्रस्त जनावरे आहेत.

जिल्ह्यात नऊ लाख ५० हजार लसीची मात्रा प्राप्त झाली होती. त्यापैकी सात लाख ७८ हजार ६५३ जनावरांना लसीकरण पूर्ण झाले. दोन दिवसांत उर्वरित लसीकरण पूर्ण होणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Lumpy Disease
Nashik Lumpy Disease : जिल्ह्यात 6 जनावरांना लम्पीची लागण; 2 जनावरे दगावली

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सदर रोगावर अटकाव करण्यासाठी आपले गोठे व गोठ्याचा परिसर स्वच्छ ठेवावा, आवश्यकतेनुसार गोठ्यात फवारणी करण्यात यावी, यासाठी ‘माझा गोठा-स्वच्छ गोठा’ ही मोहीम सर्व ग्रामसेवक व पशुसंवर्धन अधिकारी/कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे राबवावी. जनावर आजारी होताच तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकांशी संपर्क करावा व त्यांच्या मार्गदर्शनानुसार औषधोपचार करावा.

आजारी जनावरांना उबदार ठिकाणी, स्वच्छ जागेत बांधावे. जनावरांना स्वच्छ पाणी व मऊ लुसलुसीत खाद्य द्यावे. जनावरांना आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्त्वे पूरक खाद्य म्हणून देण्यात यावी. सर्व पशुपालकांना आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

Lumpy Disease
Nashik Lumpy Disease : निफाड तालुक्यात 90 जनावरांना लम्पीची लागण; 3 मृत्युमुखी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.