इगतपुरी शहर (जि. नाशिक) : रेव्ह पार्टीतील २५ संशयित आरोपींचा जामीन अर्ज इगतपुरी न्यायालयाने आज (सोमवारी) फेटाळत ७ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच रेव्ह पार्टीत वापरलेले ३ बंगले पोलिसांनी सील केले आहेत. (25 suspects in Igatpuri Reve Party case remanded in judicial custody)
हीना पांचाळचं काय?
मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरीतील स्काय ताज व स्काय लागून या अलिशान बंगल्यात चाललेल्या रेव्ह पार्टीवर ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने छापा टाकून रेव्ह पार्टी उधळुन लावली होती. या प्रकरणात अटक झालेली ‘बिग बॉस मराठी’ फेम मॉडेल अभिनेत्री हीना पांचाळसह २५ संशयितांना पोलिस निरीक्षक समाधान नागरे व पथकाने इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीक्ष पी. पी. गिरी यांनी जामीन अर्ज फेटाळत ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सरकारी वकील मिलींद निर्लेकर यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, सर्व संशयित आरोपींनी अमली व मादक पदार्थ बाळगुन सेवन केल्याप्रकरणी व वापराबाबत अधिक तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात यावे, असा युक्तिवाद केला. युक्तिवादानंतर न्यायालयाने यातील तीन कामगार, फोटोग्राफर, स्वंयपाकी असे एकुण पाच जणांचा जामीन अर्ज मंजुर केला तर उर्वरीत संशयित आरोपींना एका दिवसाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्याचा निर्णय दिला.
(25 suspects in Igatpuri Reve Party case remanded in judicial custody)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.