250 Crore Fraud Crime : ‘कलकाम’च्या दोघांना ठाण्यातून अटक; नाशिक ‘इओडब्ल्यू’ची कारवाई

Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

250 Crore Fraud Crime : बहुचर्चित कलकाम रियल इन्फ्रा लिमिटेड कंपनीने फिक्स आणि रिकरिंग आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह परराज्यांतील गुंतवणूकदारांना तब्बल सुमारे २५० कोटींचा गंडा घातला.

या प्रकरणी नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने ‘कलकाम’चा संचालक विजय सुपेकर आणि मार्केटिंग डेव्हलपमेंट डायरेक्टर तुषार सोनार या दोघांना ठाण्यातून अटक केली आहे.

दरम्यान, नाशिक शहरातील गुंतवणूकदारांची सुमारे ३० कोटींची फसवणूक कंपनीने केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. (250 Crore Fraud Crime Kalam 2 arrested from Thane crime news)

कलकाम रियल इन्फ्रा लिमिटेड या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबईतील वाशी येथे असून, कंपनीचे चेअरमन विष्णू पांडुरंग दळवी व विजय सुपेकर, सुनील वांद्रे हे संचालक आहेत; तर तुषार सोनार, देवानंद शर्मा, संतोष थोराटे, संदेश पडियार, अशोक बागूल हे मार्केटिंग डेव्हलपमेंट डायरेक्टर आहेत.

हे सर्व संशयित असून, त्यांच्याविरोधात फसवणुकीसह एमपीआडी अंतर्गत (संघटित गुन्हेगारी) राज्यभरात नऊ गुन्हे दाखल आहेत. कलकाम कंपनीत फिक्स डिपॉझिटवर ३९ महिन्यांत दीडपट आणि रिकरिंग डिपॉझिटवर ६५ महिन्यांत दुप्पट रकमेच्या परताव्याची स्कीम होती. त्यासाठी कंपनीने महाराष्ट्रासह परराज्यांत सीनिअर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह (एजंट) यांची नेमणूक केलेली होती.

कंपनीने महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा या राज्यांमध्ये विस्तार करीत आर्थिक गुंतवणूक करून घेतली होती. कंपनीमार्फत २०१९ पर्यंत गुंतवणूकदारांना परतावा मिळाला; परंतु त्यानंतर कंपनीने परतावा देणे बंद केले. या प्रकरणी नाशिकसह राज्यात नऊ पोलिस ठाण्यांमध्ये कलकाम कंपनीविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fraud Crime
Nashik Fraud Crime: दामदुपटीचे आमिष पडले महागात; 6 महिन्यात तब्बल 55 लाखाला गंडविले

नाशिकमध्ये ३० कोटींची फसवणूक

कलकाम कंपनीचे मुंबई नाका परिसरातील माधव प्लाझा येथे कार्यालय होते. योगिता बैरागी यांच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिसांत गेल्या १२ ऑगस्ट २०२२ ला आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असून, त्यानुसार फिक्स व रिकरिंगच्या ३४२ गुंतवणूकदारांनी एक कोटी १७ लाख २९ हजार ५५३ रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याचा परतावा म्हणून कंपनीकडून दोन कोटी पाच लाख ५८ हजार ८४५ रुपये देणे असताना कंपनीने परतावा दिलेला नाही. पोलिस तपासात नाशिक शहर-जिल्ह्यातील फसवणुकीची रक्कम सुमारे ३० कोटींपर्यंत पोचली आहे.

नाशिक पोलिसांकडून अटक

कलकाम कंपनीचा चेअरमन विष्णू दळवी (रा. सिंधुदुर्ग) हा पसार असून, नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचा संचालक विजय सुपेकर (४३) व तुषार सोनार (४०) या दोघांना ठाण्यातील नालासोपाऱ्यातून अटक केली आहे. दोघांना गुरुवारी (ता. २७) न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कंपनीविरोधात राज्यात फसवणुकीचे नऊ गुन्हे दाखल असूनही अद्याप एकाही संचालकाला अटक नव्हती.

नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांना पहिल्यांदाच अटक केली असून, एपीआयडी कलम लावण्यात आलेले आहे.

Fraud Crime
Jalgaon Fraud Crime : विमा परतावा वाढवून देण्याचे आमिष देत साडेपाच लाखांत फसवणूक

पोलिसांनी संशयितांची ९१ बँक खाती ‘सील’ केली असून, कंपनी आणि संचालकांच्या ३५ मालमत्ताही जप्त केल्या आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

३६ कार्यालये, अनेक कंपन्या

कलकाम कंपनीच्या संशयितांनी महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये कंपनीची ३६ कार्यालये स्थापन केलेली आहेत. तसेच, रियल इन्फ्रासह विविध स्वरूपाच्या एकापेक्षा अधिक अनधिकृत कंपन्या सुरू करून अनधिकृतरीत्या आर्थिक गुंतवणुकीच्या स्किम्स राबविल्या आहेत. ठराविक वर्षात गुंतवणूक करून परतावा देणे आणि नंतर बंद करून बेपत्ता होणे, अशी संशयितांची मोडस आहे.

या ठिकाणी गुन्हे दाखल

सिंहगड पोलिस ठाणे- पुणे (२०१८), रबाळे पोलिस ठाणे- नवी मुंबई (२०१८), वाशी पोलिस ठाणे- नवी मुंबई (२०१९), कऱ्हाड पोलिस ठाणे- सातारा (२०२०), देवळा पोलिस ठाणे- नाशिक ग्रामीण (२०२०), मालेगाव कॅम्प पोलिस ठाणे- नाशिक ग्रामीण (२०२०), चिपळूण पोलिस ठाणे- रत्नागिरी (२०२०), मुंबई नाका पोलिस ठाणे- नाशिक (२०२२), नवघर पोलिस ठाणे- मीरा-भाईंदर (२०२३).

Fraud Crime
Nashik Fraud Crime : राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षांची 55 लाखांची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.