Nashik Pune Railway : नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी 2500 कोटी; रेल्वे मंडळाकडून निधीला मान्यता

रेल्वे बोर्डाच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित मार्गासाठी दोन हजार ५०० कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली.
funding
fundingesakal
Updated on

Nashik Pune Railway : नाशिक-पुणे प्रस्तावित लोहमार्गासाठी गुरुवारी (ता. १) झालेल्या रेल्वे बोर्डाच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित मार्गासाठी दोन हजार ५०० कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता रेल्वेमार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक- पुणे- मुंबई हा राज्यातील विकासाचा सुवर्णत्रिकोण आहे. (2500 crore funding for proposed Nashik Pune railway nashik news)

मात्र, यात पुणे-नाशिक कनेक्टिव्हीटी नसल्याने पाच वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांनी सतत प्रयत्नशील राहून लोहमार्गाचे सर्वेक्षण करून घेतले. प्रस्तावित नाशिक-पुणे लोहमार्गास राज्य आणि केंद्र सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी १७ हजार ८८९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

यापैकी राज्य आणि केंद्र प्रत्येकी २० टक्के, तर इक्विटीमधून ६० टक्के निधी उपलब्ध होईल. केंद्र सरकारने नाशिक- पुणे या लोहमार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी श्री. गोडसे यांचा रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा सुरू होता.

गेल्या आठवड्यात खासदार गोडसे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत प्रस्तावित पुणे लोहमार्गासाठी निधी मंजूर करून देण्याची मागणी केली होती. खासदार गोडसे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत गुरुवारी रेल्वे प्रशासनाच्या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब दिसले. नाशिक-पुणे लोहमार्गासाठी दोन हजार ४२४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली.

funding
Pune-Nashik Railway: सेमी हायस्पीड रेल्वे ४ वर्षांत धावणार

लोहमार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या रेल्वेमार्गामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल. रस्ते अपघातांच्या तुलनेने अपघातांत मोठी घट होणार आहे. उत्सर्जनाचा खर्च अत्यंत कमी होईल. इंधनाची मोठी बचत होणार असून, रोजगाराला चालना मिळणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

कोच दुरुस्तीसाठी १९ कोटींची तरतूद

नाशिक येथील रेल्वे ट्रॅक्शन परिसरात कोच दुरुस्ती आणि मेंटेनन्सचा कारखाना उभारणीसाठी रेल्वे बोर्डाने काही महिन्यांपूर्वी ४५ कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वतः मान्यता दिली होती. खासदार गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांतून गुरुवारी रेल्वे बोर्डाने सादर केलेल्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात कोच दुरुस्ती कारखाना उभारणीच्या कामासाठी १८ कोटी ८५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे.

याबरोबरच ट्रॅक्शन परिसरात उभारण्यात येत असलेल्या व्हील रिपेअरिंग कारखान्यासाठीही तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या तरतुदीमुळे या दोन्ही प्रकल्पांचे काम वेगाने होणार आहे. रोजगार निर्मितीस मोठी चालना मिळणार असल्याची माहिती श्री. गोडसे यांनी दिली.

funding
Nashik-Pune Railway: नाशिक-नगर-पुणे रेल्वे मार्गाचं काम कुठे अडलंय? कधी सुरु होणार?; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.