नाशिक जिल्ह्यात 3 वर्षांत 3848 अपघात; अडीच हजार नागरिकांनी गमावले प्राण

नाशिक जिल्ह्याचा गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये अपघाताचा आलेख वाढताच राहिला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
accident
accidentesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातून गेलेल्या विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर मागील तीन वर्षांच्या कालावधीमध्ये अपघाताचा (Accident) आलेख वाढताच राहिला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्यात एकूण झालेल्या तीन हजार ८४८ अपघातांमध्ये दोन हजार ४४६ नागरिकांनी आपला जीव गमविला, तर दोन हजार ८२६ प्रवासी हे गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. २०१३ ते २०१९ सहा वर्षांमध्ये झालेल्या एकूण अपघातांपेक्षा गेल्या तीन वर्षांतील अपघात व अपघाती मृत्यूची संख्या अधिक आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या लक्षणीय आहे. (2500 deaths in 3848 accidents in 3 years in Nashik district)

सर्वाधिक रस्ते अपघात तुलनेने मोकळ्या रस्त्यावर म्हणजे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर वाहनचालकांना त्यांच्या वाहनांचा वेग वाढविण्यास पूर्ण वाव असतो. ओव्हर स्पीडिंग, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, रात्रीच्या सुमारास समोरील वाहनांच्या प्रखर उजेडामुळे काही काळासाठी काहीही न दिसणे यातून अपघात होत असतात.
नाशिक जिल्ह्यातून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३, ५० आणि १६० हे जातात. मागील तीन वर्षांमध्ये जिल्ह्यातून जात असलेल्या राष्टीय व राज्य महामार्गावरील वाहतुकीचे प्रमाण अधिक वाढले आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणदेखील त्या तुलनेने वाढले आहे. मार्च २०२० मध्ये देशासह राज्यात कोरोना महामारीत मोठी जीवहानी झालेली असल्‍याने सर्वत्र हळहळ व्‍यक्‍त केली जाते आहे. परंतु २०१९-२१ या तीन वर्षांमध्ये रस्‍ते अपघातात झालेल्‍या मृत्‍यूंचा आलेख देखील चिंताजनकरीत्या वाढलेला आहे. महामारीच्‍या काळात सार्वजनिक वाहतूकव्‍यवस्‍था ठप्प झालेली होती. अशात रस्‍त्‍यावर खासगी वाहनांची वर्दळ अधिक होती. परिणामी, रस्‍ते अपघातांचे व अशा अपघातात झालेल्‍या मृतांची संख्या तीन वर्षांत वाढलेली आहे.

accident
नाशिक : जनसेवा प्रतिष्ठानमुळे वाचले गायीचे प्राण

तीन वर्षांत तीन हजार ८४८ अपघात

२०१९ ते २०२१ या तीन वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गावर एकूण तीन हजार ८४८ छोटे-मोठे अपघात झाले. यामध्ये पाच हजार २७२ नागरिकांचा सहभाग होता. यातील दोन हजार ४४६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजार २५७ प्रवासी गंभीर, तर ५६९ प्रवासी हे किरकोळ जखमी झाले. २०१३-२०१९ या दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागातून गेलेल्या दोन राष्ट्रीय महामार्गावर एकूण ३०४ अपघात झाले. यात ३२७ नागरिकांनी आपला जीव गमविला. राष्ट्रीय महामार्गासह राज्यमहामार्ग देखील अपघात होण्याचे प्रमाणदेखील त्या तुलनेतच आहे. २०१५-२०१९ या दरम्यान राज्यमार्गावर झालेल्या १९९ अपघातांमध्ये ३१६ नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे.


चौकट (अपघात, प्रकार)

वर्ष अपघात | गंभीर | किरकोळ
२०१९ - ७२४ | ४४१ | ८१
२०२० - ७४६ | ४२७ | ६६
२०२१ - ७८८ | ५२८ | ४७

मृत्यू, जखमी

वर्ष मृत्यू | गंभीर | जखमी किरकोळ जखमी
२०१९ - ७८३ | ८४५ | ३७२
२०२० - ८०१ | ६९१ | १२९
२०२१ - ८६२ | ७२१ | ६८

accident
किन्नर महंताला युट्यूबवर धमकी अन् लिंगभेदी टिप्पणी; महिलेवर गुन्हा दाखल

''जिल्ह्यातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण रोखण्याच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे पालक चालकांनी करण्यासाठी वेळोवेळी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. अपघात रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवीत आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादा नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.'' - सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक जिल्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.