Nashik News : महाराष्ट्र शासनाच्या राज्य बियाणे उपसमितीची ५३ वी बैठक गुरुवारी (ता.८) मंत्रालयात कृषी विभागाचे अप्पर प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे झाली.
यावेळी राज्यातील विविध कृषी विद्यापीठाच्या २६ अन्नधान्य व फळपिकांच्या वाणांची केंद्र सरकारच्या केंद्रीय बियाणे समितीकडे शिफारस केल्याची माहिती राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी दिली. (26 Foodgrains in State Seed Sub Committee Meeting nashik news)
राज्यातील विविध कृषी विद्यापीठांच्या संशोधक संचालकांनी प्रस्तावित केलेल्या २६ अन्नधान्ये, फळे व भाजीपाला पिकांच्या वाणांबाबत बियाणे समितीच्या बैठकीत चर्चा करून केंद्रीय बियाणे समितीकडे शिफारस करण्यात आली. मागील बैठकीतील १२ वाणांना केंद्रीय बियाणे समितीने अधिसूचित करून मान्यता दिल्याची माहिती यावेळी दिली.
मागील बैठकीतील दोन फळपिकांचे प्रस्ताव केंद्रीय बियाणे समितीने नामंजूर केल्याचे विकास पाटील यांनी सांगितले. बैठकीस शेतकरी प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ डी.बी लाड, भाततज्ञ डॉ बी.डी.वाघमोडे, विकास पाटील, डॉ. समरसिंग राजपूत, डॉ.बी.डी वाघ, कृषी आयुक्तालयाचे प्रतिनिधी दीपक पाटील, डॉ.पी.के गुप्ता, डॉ.सी.एन. जावळे.
डॉ.टी.डी.देशमुख, डॉ.आम्रपाली अखारे, कर्जतचे जे पी देवमोरे, कैलास भोईटे, डॉ.एल.एन जावळे, डॉ. किरण मालशे, डॉ. एम.पी देशमुख, के एस बेग, डॉ. एन.व्ही काशीद, शाम जाधव, राहुरीचे डॉ. सुनील कराड, के. धिनेश बाबू, शरद गडाख, धनंजय कोंधालकर यांच्यासह सर्व कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिफारस केलेली पिके
बियाणे उपसमितीच्या गुरुवारच्या बैठकीत राहुरी कृषी विद्यापीठाच्या भात (फुले कोलम), भात (फुले सुपर पवना-१३-१-२१९), उडीद (फुले राजन), मूग (फुले सुवर्ण), ऊस (फुले-१५०१२), ज्वारी (फुले पूर्वा-२३७१), मका (फुले उमेद व फुले चॅम्पियन), दापोली कृषी विद्यापीठाच्या भात (कोकण-संजय व कोकण-खारा)
भगर (कोकण-सात्त्विक), मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ज्वारी (परभणी शक्ती - पीव्हीके १००९), कापूस (एनएच ६७७), सोयाबीन (एमएयूएस-७३१), हरभरा (परभणी चना-१६ बिडीएनजी २०१८-१६), तीळ (टीएलटी १०), अकोला कृषी विद्यापीठाचे मका हायब्रीड (पीडीकेव्ही आरंभ-१८-२), राळ (पिडीकेव्ही यशश्री - ८२), सूर्यफूल (सूरज पिडीकेव्ही-९६४) या अन्नधान्य पिकांच्या प्रस्तावासह फलोत्पादन विभागाच्या राजमा (फुले विराज)
कवठ (प्रताप-१), लसूण (पूर्णा एकेजी-७), मिरची (पीबीएनएस-१७), टोमॅटो (पीबीएनटी-२०), वाली (कोकण शारदा- डीपीएल-९), केगाव संशोधन केंद्राचे डाळिंब सोलापूर अनार दाणा या फळे व भाजीपाला पिकांच्या प्रस्तावांना मान्यता देवून केंद्रीय बियाणे समितीकडे शिफारस केली.
''कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा बैठकीत ऐनवेळी येणाऱ्या विषयांत मांडून केंद्र सरकारकडे तत्काळ कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्हा बँकेने अल्पभूधारक थकबाकीदार शेतकऱ्यांवर सुरू केलेली जप्तीची कारवाई स्थगित करावी, बोगस कृषी कंपन्या व पीकविमा नाकारणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणीही कृषी विभागाचे अप्पर प्रधान सचिव अनुप कुमार यांच्याकडे केली आहे.''- खंडू माधव बोडके-पाटील, सदस्य : राज्य बियाणे उपसमिती, मंत्रालय मुंबई
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.