Nashik Crime News : कामगारांनीच चोरले 26 लाखांचे साहित्य

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime News : कंपनीतील काही कामगारांनी संगनमत करून सीलबंद गोडाऊनमधून २६ लाख रुपये किमतीच्या साहित्याचा अपहार केल्याची घटना अंबड एमआयडीसीमध्ये घडली. (26 lakh worth of materials were stolen by workers themselves nashik crime news)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रसाद अशोक देशमुख (४२, रा. सम्राट ट्राफिकानो, आनंदवली, नाशिक) हे अंबड एमआयडीसीतील सिमेन्स या कंपनीचे काम पाहतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Crime News: धक्कादायक! दारू पिण्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाने जन्मदात्या वडिलांची केली हत्या

२ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत कंपनीतील काही कामगारांनी संगनमत करून कंपनीचे सीलबंद असलेले गोडाऊन खोलून कंपनीचे हित डावलून गोडाऊनमध्ये असलेले २६ लाख रुपये किमतीचे स्ट्रीप कॉपर बसबार किट नावाचे मटेरिअल व साहित्य हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेत त्याचा अपहार केला.

ही बाब लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी अंबड पोलिस ठाण्यात संशयित कामगारांविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाडेकर करीत आहेत.

Crime News
Nashik Crime News : स्वतःच्याच गोडाऊनला मालकाने लावली आग; बनाव उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.