Water Shortage : दहिवाळसह 26 गाव पाणीपुरवठा योजना विस्कळित; महिन्यातून तीनवेळा पाणीपुरवठा

water crisis
water crisisesakal
Updated on

Nashik News : तालुक्यातील माळमाथावरील दहिवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात विस्कळित झाला आहे. गिरणा धरणातून या योजनेसाठी पाणीपुरवठा होतो. दहिवाळसह २६ गावांना या योजनेचे पिण्याचे पाणी ८ ते १० दिवसाआड येते. (26 village water supply scheme including Dahiwal disrupted nashik news)

महिनाभरात तीनदा पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हवालदील झाले आहेत. विस्कळित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांनी १५ मे ला अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या मागणीचे निवेदन पालकमंत्री दादा भुसे, अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे व जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय अभियंत्यांना पाठविण्यात आले आहे.

या योजनेतून २६ गावांना सातत्याने आठ दिवसाआड तर कधी कधी १५ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. याउलट पाणीपट्टी मात्र पूर्ण दराने २ हजार ३७० रुपये आकारण्यात येते. या योजनेतून किमान चार दिवसांनी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा. जोपर्यंत दोन दिवसा आड पाणीपुरवठा करण्यात येत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

water crisis
Gram Panchayat Bypoll Election: जिल्ह्यात 34 ग्रामपंचायतीत गुरुवारी होणार पोटनिवडणूक

तोपर्यंत पाणीपट्टी आकारण्यात येवू नये, योजनेच्या दुरुस्तीसाठी गेल्या दोन वर्षापासून २२ कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. प्रशासकीय अनागोंदीमुळे सदर काम सुरू झालेले नाही. सदर काम तत्काळ सुरू करावे.

अनेक गावात पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने लोकांनी खड्डे खोदलेले आहेत. पूर्ण गावाला समन्याय पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा. नव्याने जलवाहिनी टाकण्यात यावी. मागण्या मान्य न झाल्यास १५ मे स धरणे आंदोलन करण्यात येईल.

यानंतरही आंदोलनाची दखल न घेतल्यास आगामी काळात मोर्चा, रास्तारोको, बेमुदत उपोषण यासह तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गुगुळवाड विकास संस्थेचे अध्यक्ष आर. डी. निकम, लोकशाही धडक मोर्चाचे शेखर पगार आदींसह कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांनी दिला आहे.

water crisis
Nashik News : माळमाथा परिसरातील खडी वाहतूक ठरतेय धोकादायक! खडीवर घसरून मिळतेय अपघातांना निमंत्रण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.