देवळ्यात पिके पाण्याखाली; गिरणातून 27 हजार क्यूसेक विसर्ग

Girna river overflowing due to torrential rains
Girna river overflowing due to torrential rainsesakal
Updated on

देवळा (जि. नाशिक) : देवळा तालुक्यात शनिवारी (ता. ९) रात्रीपासून सर्वदूर झालेल्या पावसामुळे (Monsoon) खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. पश्‍चिम पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असल्याने गिरणा नदीला (Girna River) मोठा पूर आला आहे. गिरणा नदीलगत असलेल्या विठेवाडी शिवारातील अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी गेल्याने ऊस, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (27 thousand cusecs discharged from girna dam Latest Monsoon Update News)

चणकापूर धरणाच्या लाभक्षेत्रात तसेच, गिरणा व पुनद नदीच्या उगमक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गिरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. सायंकाळी सहाला चणकापूर धरणातून २३ हजार ६६५ क्यूसेक, तर पुनदमधून ८८२९ क्यूसेक विसर्ग चालू झाल्याने ठेंगोडा बंधारा येथे २६ हजार ९०० क्यूसेक विसर्ग होत होता. पावसाचा जोर टिकून राहिल्यास पाण्याची आवक वाढून विसर्ग ३० हजार क्यूसेक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या ठेंगोडा, लोहोणेर, वासोळ, महालपाटणे, निंबोळा, चिंचावड, आघार, पाटणे, दाभाडी आदी गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

विठेवाडी- सावकी दरम्यानचा पूल सकाळपासून पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. गिरणा नदीच्या पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली असून, प्रशासनाने कोणतीही हानी होणार नाही, यासाठी यंत्रणा सतर्क करत धोक्याचा इशारा दिला जात आहे.

- मका, ऊस पाण्याखाली

- चणकापूर : २३, ६६५ क्युसेक विसर्ग

- पुनद : ८८२९ क्युसेक विसर्ग

- अनेक गावांचा संपर्क तुटला

- गावांना सतर्कतेचा इशारा

- महसूल, पोलिस लक्ष ठेवून

Girna river overflowing due to torrential rains
OBC जातीनिहाय जनगणनेसाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यावे : छगन भुजबळ

"चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने तसेच, पुनदचे पाणी गिरणाला येऊन मिळल्याने गिरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. गिरणाकाठच्या गावांना व परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, महसूल यंत्रणेसह पोलिस यंत्रणा परिस्थितीवर पुर्णतः नियंत्रण ठेवून आहे."- विजय सूर्यवंशी, तहसीलदार, देवळा

"गिरणाला पूर आल्याने आमच्या दहा एकर क्षेत्रात पाणी गेले. त्यामुळे मका आणि उसाचे क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. विठेवाडी, भऊर, सावकी, खामखेडा शिवारातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने तत्काळ नुकसानीची पाहणी करून आर्थिक मदत करावी."

- कुबेर जाधव, विठेवाडी

Girna river overflowing due to torrential rains
जरीफबाबा खून प्रकरण : वाहनचालकासह तिघांना मुंबईतून अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.