Nashik News : भाविकाकडून आदिमायेला 2700 ग्रॅम चांदीच्या बांगड्या

2700 gram silver bangles from devotee to saptashrungi devi nashik news
2700 gram silver bangles from devotee to saptashrungi devi nashik newsesakal
Updated on

Nashik News : आदिशक्ती श्री सप्तशृंगी मातेच्या स्वंयभू मूळमूर्तीचे रूप समोर आल्यानंतर आदिशक्तीच्या नवरुपास साजेचे आभूषणे देवी ट्रस्टने नव्याने बनविले आहेत. काही भाविक आदिमायेस आभूषणे अर्पण करीत आहे. (2700 gram silver bangles from devotee to saptashrungi devi nashik news)

नाशिक येथील भाविक अमोल खैरै यांनी सुमारे २ किलो ७०० ग्रॅम वजनाच्या एकुण १८ चांदीच्या बांगड्या मातेला अर्पण केल्याने आदिमायेचे मूर्ती आभुषणांनी खुलली गेली आहे.

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर श्री भगवतीच्या मूर्ती संवर्धनाच्या कामानंतर देशभरातील देवीच्या शक्तीपीठांपेकी स्वयंभू आदिशक्तीपीठ म्हणून सप्तशृंगी गडाचा उल्लेख होवू लागला आहे. महिषासुरमर्दिनी अष्टादशभुजा रूप धारण केलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया- आदिशक्ती भगवतीच्या मूर्ती ही अखंड पाषणातील मंदिर आणि भगवतीच्या मूळ रुपात आहे.

आदिमायेची पूर्वीचा व नवरुपातील मूर्तीचा मुकुट, कंबराजवळील आकार, हात, पावले यात बदल झाला आहे. त्यामुळे देवीच्या दैनंदिन पंचामृत महापूजा दरम्यान यापूर्वी लावण्यात येणारे सोन्या चांदीचे मुकुट, कंबरपट्टा व आदिमायेचे पाऊले यांचा आकार थोडा मोठा असल्याने ट्रस्टने नवरुपास साजेसा सोन्याचांदीचा नवमुकुट, कंबरपट्टा, पावले आदीसंह काही अलंकार भाविकांच्या देणगीतून केले आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

2700 gram silver bangles from devotee to saptashrungi devi nashik news
Jalgaon News : अमरावती-पुणेदरम्यान विशेष रेल्वेगाडी सुरू

त्यात आज नाशिक येथील भाविक अमोल खैरे यांनी आदिमायेस प्रत्येकी १५० ग्रॅम वजनाच्या १८ चांदीच्या आकर्षक डिजाईनमधील बांगड्या अर्पण करीत आदिमायेची पंचामृत महापूजा केली. या बांगड्या नाशिक येथील सराफ सुयोग मैंद यांच्याकडून बनवून घेण्यात आल्याची माहिती न्यासाचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांनी दिली आहे.

बांगड्या अर्पण दरम्यान मंदिर प्रमुख प्रशांत निकम, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी उपस्थित होते. नवस्वरुपातील आदिमायेच्या मूर्तीस आज प्रथमच नवीन चांदीच्या बांगडया चढविल्याने आदिमायेची नवरुपाचे अधिकच प्रफुल्लित तेजोमय दर्शन घडत आहे.

2700 gram silver bangles from devotee to saptashrungi devi nashik news
Nashik News : कामयानी एक्स्प्रेसला डॉ. भारती पवारांकडून हिरवा झेंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.