ओझर (जि. नाशिक) : आँनलाईन सायबर बिंगो (रोलेट) गेमच्या माध्यमातून जादा पैसे देण्याचे आमिष दाखवून 7 जणांनी एकाची 27 लाख 60 हजार रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (28 lakh fraud from roulette game Ozar crime against 7 people Nashik Crime News)
सन 2011 ते फेब्रुवारी 2023 पर्यत वेळोवेळी अचल चौरसिया, रमेश चौरसिया (दोन्ही रा. मुंबई), कैलास शहा (रा. नाशिक), राजकुमार त्र्यंबक जाधव ऊर्फ कुमार जाधव (रा. ओझर), अमोल बाबूराव कदम (रा. निफाड), दीपक चिंतामण सोनवणे (रा. लासलगाव), वैभव जगदीश बच्छाव (रा. जेलरोड) यांनी संगनमत करून ऑनलाइन सायबर बिंगो (रोलेट) गेम खेळल्यास झटपट दुप्पट पैसे मिळतात असे सांगून जादा आर्थिक लाभाचे आमिष दाखवून रामदास अर्जुन नेहरे यास ऑनलाईन सायबर बिंगो (रोलेट) गेम मोबाईलमध्ये खेळण्यास भाग पाडले. मध्यंतरी रामदास नेहरे यांना त्या खेळात त्यांची आर्थिक नुकसान व फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्याने नेहरे यांनी सायबर बिंगो (रोलेट) गेम खेळणे बंद केले. मात्र वरील संशयितांपैकी अमोल कदम, दीपक सोनवणे (रा. लासलगाव) व वैभव जगदीश बच्छाव (रा. जेलरोड, नाशिकरोड) यांनी काही दिवसानंतर नेहरेस भेटून तुझे गमावलेले पैसे परत मिळण्याची सुवर्णसंधी आहे, असे सांगून नेहरेला पैशाचे आमिष दाखवून पुन्हा ऑनलाइन सायबर बिंगो (रोलेट) गेम खेळण्यास प्रवृत्त केले. हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
यातून रामदास नेहरेंचे अंदाजे एकूण 27 लाख 60 हजार रुपये रोलेट गेममध्ये हारून आर्थिक फसवणूक केली. याबाबत रामदास नेहरे हे कैलास शहा व राजकुमार त्रिंबकराव जाधव यांच्याशी बोलले असता त्यांनी नेहेरे यांना दमदाटी करून हुसकावून लावले अशी तक्रार रामदास नेहरे यांनी ओझर पोलिसांकडे दिली.
त्यानुसार रोलेट गेम खेळविणारे व चालविणाऱ्या वरील सात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.