नाशिक : चांदवड नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना घरकुलसाठी उर्वरित निधीच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या बिऱ्हाड मोर्चाची दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंत्रालयात बैठकीचे निर्देश दिले होते.
त्यानुसार २४ मार्चला गृह निर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती वलसा नायर सिंग यांच्या दालनात बैठक होऊन निधी वितरीत करण्याचा निर्णय झाला होता. म्हाडा मार्फत ६९ लाखांचा निधी चांदवड मुख्याधिकारी यांना वर्ग करण्यात आला असून, पहिला व दुसरा हप्ता मिळून २८ लाख रूपयांचा निधी लाभार्थ्यांना वितरीत केल्याची माहिती चांदवडचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी दिली. (28 lakhs disbursed under Pradhan Mantri Awas Yojana Dr Bharti Pawar Directed by Nashik News)
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
मंत्रालयात झालेल्या बैठकीस म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित अवर सचिव व चांदवडचे मुख्याधिकारी उपस्थित होते. डॉ. सौ. पवार यांच्या निर्देशांनुसार बैठकीत निर्णय होऊन ५९ लाख रूपयांचा निधी तत्काळ मुख्याधिकारी चांदवड यांना वर्ग करण्यात आला होता.
चांदवड नगरपरिषद अंतर्गत एकूण १२० पात्र लाभार्थीची निवड झाली होती. त्यापैकी ३२ लाभार्थ्यांनी स्वेच्छेने घरकुल घेण्यास नकार दर्शविल्याने ८८ पात्र लाभार्थी असून, त्यातील ५५ लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.