Nashik News: केरळच्या तरुणाकडून 280 गडकोट सर

Hemraj M. Officials of Garudzep Foundation while honoring K
Hemraj M. Officials of Garudzep Foundation while honoring Kesakal
Updated on

Nashik News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचल्यानंतर केरळच्या कालिकत शहरातला हेमराज एम. के हा केरळहून महाराष्ट्रात १ मे २०२२ ला दाखल झाला.

२२ मे २०२२ ला महाराष्ट्रात प्रतापगड गाठला. आतापर्यंत १८ महिन्यात २८० गडकोट सर हेमराज एम. के याने केले आहे. (280 forts trek complete from Kerala youth Hemraj M nashik)

हेमराज एम. के. याने वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली आहे. पुढे काही काळ सौदी अरेबिया व दुबई येथे नोकरीदेखील केली. छत्रपती शिवरायांचा इतिहासातून मिळालेल्या प्रेरणेने त्याने शिवरायांच्या अनेक गडकोटांचे सोशल माध्यमावर माहिती घेत गडकिल्ले सर करण्यास सुरवात केली.

प्रवासात त्याने छत्रपती संभाजी महाराज - कोल्हापूर, साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे यांचीही भेट घेतली आहे. या प्रवासात त्याला अनेक दुर्गप्रेमी व गडकोट संवर्धन करणाऱ्या संस्थांनी सहकार्य केले. मंगळवारी (ता. ८) नाशिकच्या गरुडझेप प्रतिष्ठानने हेमराज एम. के याचा सन्मान केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Hemraj M. Officials of Garudzep Foundation while honoring K
Success Story: हसत-खेळत, पण शिस्‍तीत केला अभ्यास! दिशाने उलगडले राष्ट्रीय स्‍तरावर ऐतिहासिक कामगिरीचे गमक

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे यांनी त्याचे कौतुक केले. गरुडझेप प्रतिष्ठानचे सागर बोडके, अंजना प्रधान, संकेत भानोसे, रेणू भानोसे, अविनाश क्षीरसागर, संगीता भानोसे उपस्थित होते. शिवरायांच्या प्रेमापोटी हेमराजने आपले नाव कायदेशीररीत्या बदलले आहे.

त्याने आता शिवराज गायकवाड हे नाव धारण केले आहे. येत्या काही महिन्यात शिवराज कावनाई, ट्रिंगलवाडी, कळसूबाई शिखर, शिवरायांचे सागरी गडकोट बघणार आहे.

Hemraj M. Officials of Garudzep Foundation while honoring K
Success Story : पठ्ठ्यानं करुन दाखवलं! चार वेळच्या अपयशानंतर शेतकरीपुत्र झाला एसआरपीएफमध्ये पोलिस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.