Nashik Crime: निवृत्त शिक्षकांच्या 29 लाखांवर कर्मचाऱ्याचा डल्ला; निफाड पंचायत समितीतील धक्कादायक प्रकार

Money Crime
Money Crimeesakal
Updated on

Nashik Crime : जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात दोन वर्षांपूर्वी एका कर्मचाऱ्याने विभागाचा निधी इतरांच्या खात्यावर परस्पर वर्ग करत निधी हडपण्याचा प्रयत्न केला होता.

त्याचीच पुनरावृत्ती करीत निफाड पंचायत समितीतील दोन कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर देय रकमेवर डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे.

या दोन कर्मचाऱ्यांनी तब्बल २९ लाख १७ हजार रुपयांची रक्कम जवळच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. याबाबत पंचायत समितीकडून चौकशी करून अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर झाला आहे. (29 Lakhs of Retired Teachers by Employee Shocking type in Nifad Panchayat Samiti Nashik Crime)

निफाड पंचायत समितीत गणेश थोरात वरिष्ठ लिपिक, तर किरण सपकाळे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. २०२१ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या महेंद्र बाबूराव चव्हाण यांसह ११ शिक्षकांना निवृत्तीनंतरच्या काही रकमा देय होत्या.

त्यासंदर्भातील संबंधित शिक्षकांच्या बँक खात्यासह सर्व माहिती थोरात यांनी जमा केली खरी. प्रत्यक्षात मात्र, थोरात यांनी कनिष्ठ लिपिक सपकाळे यांनी दिलेल्या यादीनुसार त्रयस्थांच्या खात्यात रक्कम वर्ग केली.

याबाबत माजी मुख्याध्यापक लक्ष्मण जोंधळे यांनी मला सेवानिवृत्तीच्या देयकांचा लाभ मिळालेला नसल्याचे तक्रार केली. त्यानंतर अर्थ विभागाने चौकशी केली असता, १२ सेवानिवृत्तीधारकांचा देय धनादेश घेत वटविला.

परंतु, शिक्षकांच्या खात्यात देय जमा झालेले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी व अर्थ विभागाकडून चौकशी झाली. यात, अधिकृत यादीत फेरफार करून गटशिक्षणाधिकाऱ्याच्या शिक्क्यावर स्वतःच स्वाक्षरी करून त्रयस्थ लोकांच्या खात्यावर वर्ग केली असल्याचे निष्पन्न झाले.

यातील एका व्यक्तीच्या नावावर रक्कम जमा झाली नाही, त्यामुळे थोरात यांनी पुन्हा धनादेश घेऊन त्रयस्थांच्या नावावर रक्कम वर्ग केली. यासंदर्भात, गटशिक्षणाधिकारी, अर्थ विभागाने थोरात यांना बोलावून विचारणा केली असता सपकाळे यांनी दिलेल्या यादीतील व्यक्तींच्या खात्यावर वर्ग केल्याची कुबली दिली.

त्यावर सपकाळे यांना विचारणा झाली. त्यांनीही रक्कम वर्ग झालेल्या त्रयस्थ व्यक्तींना ओळखत असल्याचे सांगितले. या प्रकारानंतर थोरात यांना कारणे दाखवा नोटीस देत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले.

परंतु प्रत्यक्षात त्यांनी ही रक्कम अद्याप जमा केली नाही. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी लता भरसट यांनी थोरात यांनी कर्तव्यात कसूर केली असल्याचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला आहे. त्यावर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Money Crime
Dhule Crime News : सराईत चोराला बेड्या; 9 दुचाकी हस्तगत

या त्रयस्थ व्यक्तींच्या खात्यावर वर्ग झाली रक्कम

राधाकृष्ण झोले (दोन लाख ३५ हजार १४२), निर्मला राधाकृष्ण झोले (दोन लाख २० हजार २००), गायत्री प्रकाश चौधरी (दोन लाख ३५ हजार ९०१), अजय गुरूचल (दोन लाख २५ हजार ९०९), रमेश किसनलाल जयस्वाल (१७ लाख ५७ हजार ६६०), विनोद काशिराम चोपडे (दोन लाख २४ हजार ३५).

सपकाळे यांची कारकीर्द वादग्रस्त

सपकाळे यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या नावे रक्कम जमा केली असल्याचे थोरात यांनी सांगत नजरचुकीने झाले असल्याची कबुली दिलेली आहे. यातील सपकाळे यांची कारकीर्द बघता ती वादग्रस्त राहिलेली आहे.

दिंडोरी तालुक्यातील निगडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सपकाळे यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखून धरले होते. तत्पूर्वी जिल्हा परिषदेतील लघुपाटबंधारे विभागातही त्यांनी निविदेत घोळ केला होता. त्याच्या कामकाजावरून सपकाळे यांची खाते चौकशी देखील सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

"याबाबतचा पंचायत समितीकडून अहवाल प्राप्त झालेला आहे. यावर गटविकास अधिकारी यांच्याकडून सखोल चौकशी अहवाल मागविला आहे. यात अनेक कर्मचाऱ्यांचे धागेदोरे असण्याची शक्यता आहे."-रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Money Crime
Mumbai Crime : शतपावली पडतेय भारी; मुंबईत मोबाईल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com