Nashik News: 29 लाखांचा कर देण्यास टाळाटाळ; दातली ग्रामपंचायत न्यायालयात जाणार

Samruddhi Express Way
Samruddhi Express Wayesakal
Updated on

Nashik News : मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या टप्पा क्रमांक १२ अंतर्गत दिलीप बिल्डकॉन कंपनीने दातली ग्रामपंचायतीची १९ लाख रुपये घरपट्टी थकविली आहे.

ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक रस्ते, खासगी जागांचा सुमारे सहा वर्षे खोदकामासह, वाणिज्यिक वापर कंपनीने केला आहे. वारंवार मागणी करूनही कंपनीने ग्रामपंचायतकडे घरपट्टीचा भरणा केला नाही.

यामुळे दिलीप बिल्डकॉनसह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि समृद्धी महामार्गासाठी नियुक्त केलेल्या भूसंपादन जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतने नोटीस बजावली आहे.

ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १२४ चा आधार घेऊन ही नोटीस बजावली असून, दिलीप बिल्डकॉन कंपनीने ग्रामपंचायतीकडे थकीत घरपट्टी न भरल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. (29 lakhs tax evasion Datli Gram Panchayat will go to court against Samriddhi Contractor and Road Development Corporation nashik)

समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी दगड आणि मुरूम उपलब्ध करण्यासाठी दिलीप बिल्डकॉनने दातली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गट क्रमांक ३९८ मध्ये २.९८ हेक्टर व गट क्रमांक ६०६ मध्ये २.५१ हेक्टरवर १०१८ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झालेल्या ग्रामसभांमध्ये खोदकामासाठी ना हरकत दाखला मिळविला होता.

खोदकाम शासकीय नियमाच्या अधीन राहून करावे, असे ग्रामसभेने निश्चित केले होते. त्यानुसार दिलीप बिल्डकॉनने समृद्धी महामार्गासाठी गौण खनिज उपलब्ध करून घेतले होते.

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जागांच्या वापर, तसेच सुमारे सहा वर्षे अवजड वाहनांतून मुरूम, दगड, माती वाहून नेण्यासाठी रस्त्यांचा वापर केल्याबद्दल मे २०२२ मध्ये दातली ग्रामपंचायतीने कंपनीला घरपट्टीचे १९ लाख २०,६०१ रुपयांचे बिल पाठविले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Samruddhi Express Way
Nashik News: त्रंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात गर्दीमुळे पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम

मात्र, त्याकडे कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सप्टेंबर २०२२ मध्ये जप्तीची नोटीस पाठविली होती. तरीही कुठलाही कर भरला नाही. दिलीप बिल्डकॉनकडून चालढकल होत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने थकीत घरपट्टी वसुलीसाठी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी शासनाने रॉयल्टी माफ केल्याचे सांगत ग्रामपंचायतींना कर आकारणी करण्याचा अधिकार नाही, असे कारण दिलीप बिल्डकॉनच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आले व ग्रामपंचायतच्या कर मागणी पत्राला ठेंगा दाखविण्यात आला.

घोरवड ग्रामपंचायतच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे टप्पा क्रमांक १३ मध्ये बांधकाम करणाऱ्या बीएससीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने घोरवड ग्रामपंचायतला कर मागणीची बिले अदा केली आहेत.

दिलीप बिल्डकॉनने दातली ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील मिळकतींमध्ये खोदकाम करण्यासाठी ग्रामसभेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविले.

प्रत्यक्षात नियमाप्रमाणे त्या ठिकाणी सहा मीटर खोलीपर्यंत खोदकाम करणे बंधनकारक असताना, अधिकच्या क्षेत्रात आणि १६ ते २० मीटर खोलीपर्यंत खोलीकरण केले. ही बाब चुकीची आणि बेकायदेशीर आहे.

संबंधित शासकीय यंत्रणांनी याची खातरजमा जमा करावी, असेही ग्रामपंचायतीच्या नोटिसीत नमूद केले आहे.

"समृद्धी महामार्गाच्या ७०० किलोमीटरच्या अंतरात स्थानिक ग्रामपंचायतींकडे त्या-त्या पॅकेजमधील ठेकेदारांनी कर भरणा केला आहे. केवळ पॅकेज १२ मध्ये दिलीप बिल्डकॉनने ग्रामपंचायतीना उत्पन्नापासून बाजूला ठेवले. वावी, दातली, गोंदे या तीन ग्रामपंचायतींची ही परिस्थिती आहे. याशिवाय दातली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ग्रामसभेच्या ठरावाव्यतिरिक्त इतर ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन केले आहे. ग्रामपंचायत कर मागणी पत्रानुसार देयक अदा करून बेकायदेशीर उत्खननाची चौकशी झाली पाहिजे, अन्यथा आम्ही उच्च न्यायालय अथवा सक्षम न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे."-हेमंत भाबड, सरपंच, दातली

Samruddhi Express Way
Onion Subsidy: कांदा अनुदान बँक खात्यात होणार वितरित! आमदार दिलीप बनकर यांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()