Nashik : मनमाडला वीज कंपनीचा लाचखोर सहायक अभियंत्यासह तिघे जेरबंद

Bribe crime
Bribe crimeesakal
Updated on

नाशिक : घराच्या छतावरील अनधिकृत बांधलेल्या वीजतारा काढण्यासाठी २० हजारांची लाच (Bribe Crime) स्वीकारताना मनमान येथील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंत्यासह दोघांना अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या दुकानातच लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribery Prevention Department) पथकाने ही कारवाई केली. (3 arrested along with corrupt assistant engineer of Manmad MSEDCL nashik crime news)

वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता महेंद्र श्रावण चव्हाण (३७, रा. शरयू पार्क-२, जत्रा हॉटेलजवळ, आडगाव, नाशिक), ठेकेदार कुणाल दादा ठाकरे (३०, रा. शिक्षक कॅालनी, ता. मनमाड, नाशिक), ठेकेदार अंकुश मोठाभाऊ दुकळे (२९, रा. मु. पो. झाडी, ता. मालेगांव) अशी संशयित लाचखोरांची नावे आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या माहितीनुसार, तक्रारदारच्या घरावरील खांबाला बंदस्थितीतील वीजतारा अनधिकृतरित्या बांधल्या होत्या. याबाबत तक्रारदाराने वीज कंपनीच्या कार्यालयात अर्ज केला होता. यावेळी सहायक अभियंता चव्हाण यांनी खासगी ठेकेदारास नेमले. तर, त्यांच्यमार्फत ठेकेदाराने त्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली.

Bribe crime
Nashik : खत आणि पीक उत्पादनात आत्मनिर्भरसाठी विशेष समिती

त्यानुसार, पथकाने सापळा रचून संशयित ठेकेदार कुणाल ठाकरे हा तक्रारदाराच्या दुकानात लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी आला असता रंगेहाथ अटक केली. सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव, हवालदार बाविस्कार, प्रफुल्ल माळी, प्रकाश महाजन, परशुराम जाधव यांचया पथकाने बजावली.

Bribe crime
वकिलवाडीत अचानक कोसळले गुलमोहराचे झाड; पाहा Photos

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()