Nashik Crime News : शहरात 3 घरफोड्या; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

robbery
robbery esakal
Updated on

नाशिक : शहरात काही दिवसांपासून दुचाकी आणि घरफोड्या करून ऐवज लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी स्कॉर्पिओसह सात दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. तर आता शहरात तीन घरफोडीच्या घटनांमध्ये साडेसहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, सततच्या या घटनांमुळे शहर पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले असून, नाकाबंदी व रात्रीच गस्ती असतानाही या घटना होत असल्याने पोलिसांच्याच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (3 burglaries in city Lumpas instead of six half lakhs Nashik Crime News)

संध्या संदीप ठाकूर (रा. पद्‌मावती रो हाऊस, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. ४) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि ३ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात २ लाख ५० हजारांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने होते.

याप्रकरणी आडगाव पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज नारायण काकड (रा. हनुमाननगर, चांदसी रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे मखमलाबाद गावात मातोरी रोडवर ओम हार्डवेअर नावाचे दुकान आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

robbery
Dhule Crime News : कडाक्याच्या थंडीत नागरिकांना चोरट्यामुळे हुडहुडी; पोलिसांपुढे मोठे आव्हान

मंगळवारी (ता. ३) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील ३ हजारांचा कॅमेरा, २ हजारांची हार्ड डिस्क, ४० हजारांचा हार्डवेअरचे साहित्य असा ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमोद रमेश वैशंपायन (रा. प्रणव बंगला, संभाजी चौक) यांच्या फिर्यादीनुसार, २९ डिसेंबर ते २ जानेवारी यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या खिडकीचे गज तोडले आणि आत प्रवेश करीत २ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात १ लाखांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने, मनगटी घड्याळ आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

robbery
Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.