Nashik News : राज्यात आकांक्षित शहरात जिल्ह्यातील 3 शहर!

Aspirational District Programme
Aspirational District Programmeesakal
Updated on

Nashik News : केंद्र शासनाच्या महत्त्वा‍कांक्षी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित शहर करण्यात येणार आहे. या उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. (3 cities of district have been included in Aspirational District Programme nashik news)

केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी राज्यांना आकांक्षित शहर कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यादृष्टीने राज्यातील गावांचे शहरीकरण व त्यातून उद्‍भवलेल्या समस्यांबाबत विविध यंत्रणासोबत विचारविनिमय करण्यात आला.

त्यानुषंगाने नागरीकरण झालेल्या ‘ड’ वर्ग महापालिका ‘ब’ आणि ‘क’ वर्ग नगर परिषदा नगरपंचायतीतील शहरांचा समतोल आणि सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने निवडक निर्देशकांच्या सातत्यपूर्ण संनियंत्रणाच्या माध्यमातून राज्यात आकांक्षित शहरे कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २० डिसेंबर २२ ला बैठक होऊन त्यात शहरांच्या निवडीसाठी नगरविकास विभागाच्या नियंत्रणाखाली नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शहराची यादी व निकषांची शिफारस करण्यासाठी कळविण्यात आले होते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Aspirational District Programme
Ramzan Eid 2023 : शिरखुर्म्याच्या गोडव्यास महागाईचा तडका; खरेदी- विक्रीवर परिणाम

त्यानुसार नगरविकास आयुक्त नगर परिषद संचालनालय यांच्या शिफारशीनुसार राज्यात ५७ महापालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतीची निवड करण्यात आली आहे. त्यात, नाशिक जिल्ह्यातील तीन नगर परिषद व नगरपंचायतीचा समावेश आहे.

पाच निकषांवर निवड

आकांक्षित शहरासाठी निवडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडीसाठी दरडोई महसूल, पाणीपुरवठा, पक्क्या घरांची टक्केवारी, अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्येची टक्केवारी आणि जीएसएफ स्टार रॅकिंग हे पाच निकष ठरविण्यात आले. त्यावरून शहरांची निवड करण्यात आली आहे.

निवडलेली शहर

राज्यातील ‘ड’ वर्ग गटातील १८ पालिकांपैकी नऊ महापालिकांची निवड करण्यात आली असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेचा समावेश आहे. ‘ब’ वर्ग पालिकांच्या गटात ७४ नगर परिषदांपैकी १२ नगर परिषदांची निवड करण्यात आली असून, त्यात मनमाड नगर परिषदेचा समावेश आहे.

तर ‘क’ वर्ग गटातील राज्यातील १४१ नगर परिषदांपैकी १८ नगर परिषदांची निवड झाली असून, त्यात इगतपुरी नगर परिषदेचा समावेश आहे. तर राज्यातील १४८ नगरपंचायतीपैकी १८ नगरपंचायतीची निवड करण्यात आली असून, त्यात जिल्ह्यातील एकाही नगरपंचायतीचा समावेश नाही.

ब महापालिका मालेगाव

क नगर पालिका मनमाड

क नगर परिषद इगतपुरी

Aspirational District Programme
Nashik News : सह्याद्री फार्म्सकडून कर्मचाऱ्यांना 70 कोटीचे समभाग; कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.