नाशिक : नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्येच लाचखोरीत नाशिक विभागाने राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून, ४५ सापळ्यांमध्ये ७० लाचखोर लोकसेवक अडकले आहेत. नाशिक विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत तीन महिन्यात सुमारे तीन कोटींची रक्कम जप्त केली आहे. (3 Crore seized in bribes in 3 months Nashik division leading in state Nashik Bribe Case)
गेल्या आठवड्यात सिन्नर तालुका सहाय्यक निबंधकास २० लाखांची लाच घेताना अटक केल्याचा प्रकार राज्यभर चर्चिला गेला. त्यापूर्वी नाशिकच्या भूमिअभिलेख कार्यालयातील अधीक्षकपदावरील अधिकाऱ्यासही लाच घेताना अटक केली होती.
२०२३मध्ये आतापर्यंत विभागात राज्यातील सर्वाधिक ४५ सापळ्यांमध्ये ७० लाचखोरांना अटक झाली आहे. त्यातही विभागात सर्वाधिक १८ सापळे हे नाशिक शहर-जिल्ह्यातील आहेत. लाचखोर ७० जणांमध्ये चौघे वर्ग एक अधिकारी, तर सर्वाधिक ३६ लाचखोर हे वर्ग तीनचे कर्मचारी आहेत.
राज्यात गेल्या तीन महिन्यांत २२४ सापळे रचण्यात येऊन ३१८ लाचखोरांना अटक करण्यात आली. २०२२मध्ये पहिल्या तिमाहीत १८५ सापळे रचण्यात येऊन २४७ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे यंदा तुलनेत लाचखोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे तक्रारदारही न संकोचता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासाठी येत आहेत.
महसुल, पोलीस आघाडीवर
नाशिक विभाग लाचलुच प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत गेल्या तीन महिन्यांत महसुल विभागातील ९ लाचखोर अधिकारी-कर्मचारी सापळ्यात अडकले. यात नाशिक व जळगावचे प्रत्येकी तीन, तर नगर, नंदूरबार व धुळ्यातील प्रत्येकी एका महसुल अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
याखालोखाल पोलीस दलाचा क्रमांक लागतो. विभागात ७ लाचखोर पोलीस कर्मचारी जाळ्यात सापडले असून, यात नगर व जळगावचे प्रत्येकी तीन, तर नंदूरबारच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, भूमी अभिलेख, कृषी विभाग, वीज कंपनी आदी विभागांतील सुमारे ४५ सापळ्यांमध्ये ७० लाचखोर सापडले आहेत.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
विभागनिहाय सापळ्यांची आकडेवारी
विभाग सापळे
* नाशिक : ४५
* पुणे : ४३
* छत्रपती संभाजीनगर : ३७
४. ठाणे : २७
५. नागपूर : २३
६. अमरावती : २०
७. नांदेड : १७
८. मुंबई : १२
जिल्हानिहाय आकडेवारी
* नाशिक : १८
* नगर : ०९
* जळगाव : ०९
* नंदूरबार : ०५
* धुळे : ०४
"लाच प्रकरणांत नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. त्यासाठी १०६४ या क्रमांकावर अथवा नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी (०२५२) २५७५६२८ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी. तक्रारदारांची माहिती गुप्त ठेवली जाईल."
-शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.