Nashik : तुम्हीच सांगा जगायचे कसे?; 3 दिवसांच्या पावसानंतर रस्त्यावरील व्यावसायिकांचा प्रश्‍न

Heavy Rain Damage
Heavy Rain Damageesakal
Updated on

नाशिक : अवघ्या चार दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांनी कर्ज, उसने पैसे घेत रस्त्यावर व्यवसाय उभा केला. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विक्रीसाठी आणलेला मालाचा बचाव करावा लागत असल्याने तुम्हीच सांगा, आम्ही जगावे कसे, असा प्रश्‍न या व्यावसायिकांना पडला आहे. (3 days continuous Heavy rain street professionals in trouble Nashik Latest Marathi News)

कोरोनानंतर यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर निर्बंधमुक्त वातावरणात दीपावली साजरी होत आहे. त्यामुळे मंदीचे वातावरण असूनही खरेदीदार व विक्रेत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे. यातील अनेकांनी कर्ज, उसनवार पैसे घेऊन तात्पुरता व्यवसाय उभा केला आहे. परंतु रोजच येणाऱ्या जोरदार पावसाने मोठ्या जिद्दीने उभा केलेला व्यवसाय अक्षरश झाकून ठेवावा लागत असल्याचे दिसून आले.

मालाचे संरक्षण करणे जिकिरीचे

कोरोनाकाळात सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील अनेक लहान- मोठ्या कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे अनेक तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. मात्र त्यातील अनेकांनी जिद्द न सोडता सिझनेबल व्यवसाय सुरू केले. यात आकाशकंदील, रुमाल विक्री असे व्यवसाय अनेकांनी पसंत केले, तर काहींनी फटाके विक्रीला पसंती दिली.

Heavy Rain Damage
Nashik Political News : माजी नगरसेवक साबळे यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी!

याशिवाय अनेक छोटे व्यवसाय सुरू केले, त्यासाठी जिद्दीने भांडवलही उभे केले. परंतु पावसाच्या संततधारेने व्यवसाय होणे दूरच, परंतु पावसापासून विक्रीसाठी आणलेल्या मालाचे संरक्षण करणे जिकिरीचे झाले आहे. बुधवारी (ता.१९) सायंकाळी पावसाने थोडी उघडीप देताच या विक्रेत्यांशी संवाद साधला असता, त्यांनी रोजच्या पावसामुळे व्यवसाय करणे अवघड झाल्याचे सांगितले.

"नातेवाईक व मित्रांच्या मदतीने दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तुंची विक्री सुरू केली, परंतु गेल्या तीन दिवसांपासून रोजच कोसळणाऱ्या पावसामुळे ग्राहक दुरापास्त झाला आहे. पावसाच्या भीतीने माल झाकूनच ठेवावा लागत आहे." - संजय तिवारी, व्यावसायिक

"यंदा निर्बंध शिथिल झाल्याने मोठ्या प्रमाणावर आकाशकंदील बनवून विक्रीसाठी ठेवले आहेत, परंतु दिवाळीला अद्याप दोन- तीन दिवस बाकी असल्याने अद्याप आकाशकंदीलाला मागणी नाही." - राजू परदेशी, आकाशकंदील विक्रेता.

Heavy Rain Damage
Nashik Rain Update : त्र्यंबकेश्‍वरमध्ये कोसळला 119 mm पाऊस; भाताचे मोठे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.