Nashik News : आचारसंहितेच्या भीतीने प्रशासकीय मंजुरीसाठी घाई; राज्यात पहिल्या दहांमध्ये विभागातील तीन जिल्हे

fund
fundsakal
Updated on

Nashik News : राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा येत्या महिन्यात होऊ शकते. त्यामुळे आचारसंहिता जाहीर होण्याच्या भीतीने सध्या विविध कामांच्या प्रशासकीय मंजुरीसाठी घाई दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने सध्या राज्य शासनाच्या आदेशावर स्थानिक स्वराज्य संस्थांत कामाचा जोर आहे. परिणामी, राज्यात निधी खर्चात पहिल्या दहांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्हे आहेत.

जिल्हा नियोजन समिती हे प्रशासकीय कामांच्या मंजुरीसाठी प्रमुख केंद्र असल्याने जिल्हा परिषद व महापालिकांच्या प्रशासकीय कामांशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या मंजुरीवर लोकप्रतिनिधींची करडी नजर आहे. (3 districts of North Maharashtra are in top 10 in fund expenditure in state nashik jalgaon news)

त्यात राज्यातील भारतीय जनता पक्ष-शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सत्तेत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची भर पडल्याने जिल्ह्यात १५ पैकी दोन वगळता सगळेच आमदार सत्ताधारी गटाचे झाले. साहजिकच, त्यांच्यातील मुंबईतून कामे मंजूर करून आणण्याच्या स्पर्धेला तोंड देताना प्रशासकीय यंत्रणा घामाघूम झाली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हेही सत्तेत आल्याने कामांच्या प्रशासकीय मंजुरीसाठी आमदारांमध्ये चुरस आहे. अशातच भाजपचे आमदारही मागे नाहीत. साहजिकच, या भाऊगर्दीत कामांसाठी प्रचंड मागणी आहे. लोकप्रतिनिधींच्या समर्थकांमध्येही स्पर्धा आहे.

कामांना प्रशासकीय मंजुरी मिळविण्याच्या या प्रयत्नांत ‘प्रेशर टॅक्सीज’ला महत्त्व आले आहे. साहजिकच, गावोगावच्या आमदार आणि माजी आमदारांतील समर्थकांतील स्पर्धेमुळे एकाच कामासाठी वेगवेगळ्या दबावाच्या अनुभवाला यंत्रणेला तोंड द्यावे लागत असल्याचे सांगण्यात येते.

fund
NCP Mumbai President : राष्ट्रवादी’च्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तिपत्र

५४ कोटी खर्च

राज्यात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि नगर हे तीन जिल्हे निधी खर्चात पहिल्या दहांमध्ये आहेत. नाशिकला ६३ कोटी ८३ लाख निधी मिळाला, त्यापैकी ५४ कोटी २६ लाख निधी खर्च झाला. जळगावला ७३ कोटी ७३ लाख मिळाले, त्यापैकी ५४ कोटी २३ लाख खर्च झाले; तर नगरला मिळालेल्या ६३ कोटी ९९ लाखांपैकी ४८ कोटी ३९ लाखांचा खर्च झाला आहे.

जिल्हे प्राप्त निधी खर्च टक्के राज्यात क्रमांक

नाशिक ६३ कोटी ८३ लाख ५४ कोटी २६ लाख ७.९८ ६

जळगाव ७३ कोटी ७३ लाख ५४ कोटी २३ लाख १०.६३ ३

नगर ६३ कोटी ९९ लाख ४८ कोटी ३९ लाख ७.८१ ७

fund
Nashik News: चेक पोस्ट बंद न झाल्यास 2 पासून देशात ‘चक्का जाम’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.