पिकअप व लक्झरी बस भीषण अपघातात 3 शेतकरी ठार

accident
accidentesakal
Updated on

बोरगाव/ सुरगाणा (जि. नाशिक) : सापुतारा- वणी मार्गावरील चिखली (ता. सुरगाणा) येथे लक्झरी बस आणि मालवाहू पिक-अप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कळवण तालुक्यातील तीन शेतकरी ठार झाले. तर पाच जण जखमी झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेतकरी कैलास पंडित दळवी (वय २५, तताणी, ता. कळवण), पंढरीनाथ मुरलीधर भोये (५५, शृंगारवाडी, ता. कळवण), नारायण पवार ( ५५, घागरबुडा, ता. सुरगाणा) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मालवाहू पिक-अप (एमएच- ४१- एयू- २१९२) मधून भाजीपाला घेऊन नाशिक बाजार समितीत निघाले होते. त्याचवेळी नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या लक्झरी बसने (आरजे- २७- पीबी- २६५८) चिखली गावाजवळ पिक-अपला जोरदार धडक दिली. यात पिक-अपमधील तिन्ही शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. सावळीराम साबळे व यशवंत गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

accident
राष्ट्रीय महामार्गावर 5 महिन्यात 94 अपघात

अपघातानंतर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मृतांच्या नातेवाइकांनी जोपर्यंत लक्झरी बसचालकाला ताब्यात देत नाही, तोपर्यंत मृतदेह न हलविण्याची भूमिका घेतली. दरम्यान, पोलिस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे, संतोष गवळी, पराग गोतरणे यांनी नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर वातावरण शांत झाले. सुरगाणा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.

स्थानिक बाजारपेठेची उणीव

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथा व कळवण तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी, टोमॅटो, वाल, घेवडा, मिरची, कांदा पीक घेतले जाते. मात्र, या मालाच्या विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. प्रत्यक्षात हाती कमी नफा मिळतो. आजच्या घटनेने बोरगाव परिसरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मुद्दा गांभीर्याने चर्चेत आला.

accident
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत २७२ अपघात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()