Nashik Crime News : सिन्नरला दिवसाढवळ्या 3 ठिकाणी घरफोड्या

Burglary  Nashik latest crime news
Burglary Nashik latest crime newsesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : शहरातील शिंपी गल्ली व कमलनगर परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी तब्बल ५५ हजारांची रोकड व पाच लाखांचे सोने लंपास केले. दिवसेंदिवस शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून चोरटे दिवसाढवळ्याही घरात घुसून चोरी करत आहे. यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच आता सुट्या लागल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (3 house burglaries in Sinnar in daylight Nashik Latest Crime News)

शिंपी गल्ली येथे राहणाऱ्या अॅड. स्वाती श्रीराम क्षत्रिय (४९) या रविवारी (ता.१६) सकाळी कामानिमित्त बाहेर गेल्या असता चोरट्यांनी सकाळी ७.३० च्या सुमारास घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करत कपाटाचे लॉक तोडून त्यांनी दागिने व रोकड लंपास केली.

चोरट्यांनी कपाटातील २५ हजारांची रोकड, १ ग्रॅमचे कानातले, ९ हजारांचे कानातले ८ जोड, ९ हजारांचे दोन झुबे, ९ हजारांचे दोन वेल, १५ हजारांची सोन्याची अंगठी, १८ हजारांच्या दोन अंगठ्या, १ लाख ५ हजारांचे सोन्याचे बारीक बारीक तुकडे, ९ हजारांचे सोन्याचे मनी, १५ हजारांच्या चांदीच्या दोन निरंजन्या, २ कोयऱ्या, ६ वाट्या, दोन तांबे असा एकूण २ लाख २३ हजारांचा मुद्देमाल लांबवला.

यानंतर चोरट्यांनी क्षत्रिय यांच्या घराच्या वरती बांधकाम व्यावसायिक मनोज प्रतापराव देशमुख (३४, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक) यांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून प्रवेश केला. कार्यालयात ठेवलेली ३० हजारांची रोकड घेऊन चोरट्यांनी तेथून पोबारा केला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच अॅड. क्षत्रिय यांनी लागलीच घराकडे धाव घेतली असता सर्व दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.

वरील मजल्यावरील देशमुख यांचीही रोख रक्कम चोरीला गेल्याचे कळाले. सिन्नर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक निरीक्षक विजय माळी, उपनिरीक्षक जाधव यांनी पाहणी केली. अॅड. क्षत्रिय यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Burglary  Nashik latest crime news
Nashik : खचलेल्या रस्त्याचे काम 15 दिवसांपासून बंद

तिसऱ्या घटना सरदवाडी रोड परिसरातील कमलनगर भागात घडली. याठिकाणी चोरट्यांनी ५ तोळ्यांचे दागिने लंपास केले. हरिओम प्लाझामध्ये राहणारे ग्रामसेवक प्रशांतकुमार मधुसूदन भिसे (४०) हे गावी गेले होते. चोरट्यांनी संधी साधत रात्रीच्या वेळी कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त करत कपाटात ठेवलेली अडीच तोळ्यांची सोन्याची चेन, १ तोळ्याची अंगठी, दीड तोळ्यांची सोन्याची अंगठी असा ५ तोळ्यांचा म्हणजेच जवळपास अडीच लाखांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले.

दोन दिवसांनी भिसे घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी भिसे यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस नाईक तांबडे करत आहेत.

दिवसाआड होतेय घरफोडी

शहरासह तालुक्यात एक दिवसाआड घरफोड्या होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून घडत आहेत. शहरात तर दिवसाढवळ्या चोरटे घराचे कुलूप तोडून बिनधास्तपणे दागिने व रोकडवर हात साफ करत आहे. महिनाभरात तालुक्यात तब्बल १२ ते १५ घरफोड्या झाल्या असून पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

अनेक घरफोड्यांच्या प्रकाराचा छडा लागलेला नसताना कधी-कधी एकाच रात्री दोन-तीन घरफोड्या होत असल्याने चोरटे पोलिसांना एकप्रकारे आव्हानच देत आहे. पोलिसांनी कडक पावले उचलत या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Burglary  Nashik latest crime news
PFI Case : राममंदिर पाडून पुन्हा बाबरी उभारण्याचा डाव!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.