मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी भीषण अपघात; 6 जण जागीच ठार

या अपघातात ट्रॅक्टर पलटी होवून अल्टो कारवर पडल्याने सहा जण जागीच ठार झाले आहेत.
accident
accidentesakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : वणी- मुळाणे- कळवण रस्त्यावरील मुळाणे बारीत एकमेकांना जोडलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉलीतून कामाच्या ठिकाणी घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रॉल्या पलटी होवून अपघात झाला. या अपघातात तीन महीला, दोन पुरुष व १ बालिका ठार झाले असून १५ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पाच रुग्ण वाहिकांच्यासाह्याने नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत व जखमी जळगांव जिल्ह्यातील पाचाेरा व भडगांव तालुक्यातील आहे.

accident
प्रेमविवाह झालेला तरुण बेपत्ता; मुलीकडच्यांनी घातपात केल्याचा संशय

गुरुवारी (ता. २) दुपारी ३ वाजेच्या सुमारास कळवणकडून मुळाणे मार्गे वणी परीसरात रस्त्याच्या कामासाठी पारोळा, भडगांव तालुक्यातील मजुरांना घेवून ट्रक्टर जात होता. या ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून त्यात कामाचे साहित्य, मजुरांचे साहित्यासह २१ मजुरांना ट्रॉलीत बसवले होते. मुळाणे (मार्कंडेय) बारीत उतारावर ट्रक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले यावेळी ट्रॅक्टर चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न करीत असताना ट्रॅक्टर ट्रॉली एकमेकांवर आदळून पलटी झाल्या. यावेळी ट्रॅक्टर अन् ट्रॉली रस्त्यावर तसेच घाटाच्या दरीत सामानासह फेकले गेले. या सुमारास समोरून येणाऱ्या अल्टो कारवर सदरचा ट्रक्टर पलटी झाला. यात सुदैवाने कारमधील प्रवासी वाचले असल्याची माहीती आहे. या अपघातात घटनास्थळी दोन पुरुषांसह एक महिला जागीच ठार तर तीघे वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झाले आहे.

या अपघातात सरला बापू पवार (वय ४५), बिबाबाई रमेश गायकवाड (वय ४०), वैशाली बापू पवार (वय ४) रा उंदिरखेडा, जि. जळगाव हे मयत झाले आहे. तर सुरेखा अशोक शिंदे (वय २२ रा. हिंगोणा, ता. धरणगांव, जि. जळगांव), संगिता पोपट पवार (वय ४५, रा. उंदिर खेडा ता. पारोळा जि. जळगांव), आकाश पोपट पवार (वय ४५ वर्ष, रा. उंदिरखेडा), तनु दिपक गायकवाड (वय १५ कुसुंबा ता. जि. जळगांव), अनुष्का दिपक भायकवाड (वय १ वर्षे रा. कुसुंबा जि. जळगांव), मनिषा दिपक गायकवाड (वय २४ रा. कुसुंबा ता. जि. जळगांव), गणेश बापू पवार (वय ७ रा. उंदिर खेडा ता. पारोळा, जि. जळगांव), प्रिया संजय म्हस्के (वय ३, रा. जामनेर, जि. जळगांव), लक्ष्मण अशोक शिंदे (वय २७ वर्ष रा. हिंगोणा ता. भडगांव, जि.जळगाव), अजय नवल बोरसे (वय २१ वर्षे रा. मिराड ता. भडगांव), विशाल बापू पवार (वय ११ रा. उंदिरखेडा मा. धरगांव जि. जळगांव), गणेश बापू पवार (वय ७ वर्ष, रा. उंदिरखेडा, ता. पारोळा), प्रिया संजय म्हस्के (वय ८ वर्षे, रा. जामनेर), अजय नवल बोरसे ट्रक्टर चालक (वय २१ रा. मिराड ता. भडगांव जि. जळगांव), बापू पवार (वय ४० रा. उंदिरखेडा पारोळा) हे जखमी झाले आहे.

accident
नालाकाठावरील घर कोसळले; इमारतीचा अर्धा भाग नष्ट, जिवितहानी टळली

जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. जखमींवर येथील डॉक्टर असोसिएशनच्या डॉक्टरांनी रुग्णालयात धाव घेवून ग्रामिण रुग्णालयात हजर असलेल्या एकमेव डॉक्टरांना मदत केली. तसेच घटनास्थळी बाबापूर येथील युवकांनी तर वणी येथे सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी मदत कार्य केले. वेगवेगळ्या ठिकाणच्या पाच रुग्ण वाहिकांद्वारे जखमींना वणी व जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.