Nashik News: भायखळा झोपडपट्टीतील 3 मजली घर कोसळले; पती-पत्नीसह चौघे जखमी ; 20 लाखांचे नुकसान

Relief work going on in a collapsed house in Byculla slum in Malegaon.
Relief work going on in a collapsed house in Byculla slum in Malegaon.esakal
Updated on

मालेगाव : येथील भायखळा झोपडपट्टीतील तीन मजली बल्ली, फरशी स्लॅबचे घर कोसळले. त्यात पती-पत्नीसह एका कुटुंबातील चौघे जखमी झाले आहेत.

एकाची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी (ता. ८) पहाटेच्या सुमारास घर कोसळल्याने शेजारील तीन घरांना हानी पोहोचली. जीवितहानी झाली नाही. दुर्घटनेत सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. (3 storey house collapses in Byculla slum Four injured including husband and wife 20 lakhs loss Nashik News)

जखमींवर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भायखळा झोपडपट्टीतील खांडका मशिदीजवळील प्लॉट क्रमांक ७४४ यावर शेख मोहम्मद जाबीर बोस्तानी हे राहत्या घराच्यावर बल्ली, ‘ॲंगल' व फरशी स्लॅबच्या तीन मजलीचे बांधकाम करत होते.

घराची एका बाजूची भिंत कमकुवत असल्याचे रहिवाशांनी त्यांना सांगितले. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यातच पहाटे हे घर कोसळले.

त्यात त्यांच्या कुटुंबीतील अबुअसीम जैद मोहम्मद (वय ४८), त्यांची पत्नी मुशिरा असीम जैद (वय ३२), सौदमलीक आसीम जैद (वय २५) व अनिसा आसीम जैद (वय ८) हे जखमी झाले. सौदमलीकचे पायाचे, तर मुशिराचे हाताचे हाड मोडले आहे. अन्य दोघांना डोक्याला किरकोळ मार लागला आहे.

ढिगाऱ्याखालून काढले बाहेर

कोसळलेल्या घराचा ढिगारा जवळच्या इस्हाक मोहम्मद इस्माईल, अन्वर मोहम्मद हनीफ, जलील अहमद मोहम्मद इब्राहिम यांच्या घरावर कोसळल्याने त्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. चार घरांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार व सहकारी चार अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. शेजारील रहिवाशांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. अग्निशमन दलात याची नोंद झाली आहे.

Relief work going on in a collapsed house in Byculla slum in Malegaon.
Nashik News: बागलाणसाठी 311 कोटींचा निधी मंजूर : दिलीप बोरसे

अनधिकृत बांधकाम

शहरातील पूर्व भागात सर्रासपणे विनापरवानगी व अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. कोसळलेल्या घरासाठी बांधकाम व नूतनीकरण करण्याची परवानगी घेतली नाही.

महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, उपायुक्त सुहास जगताप यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. प्रभाग अधिकारी यांनी नोटीस बजावली होती की नाही? याची चौकशी केल्यावर याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाने अवैध बांधकामांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

Relief work going on in a collapsed house in Byculla slum in Malegaon.
Nashik Unseasonal Rain Damage: अवकाळी पावसामुळे एकावेळी कांदा लागवडीचा ताण! मजुरांच्याअभावामुळे शेतकरी मेटाकुटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()