Success Story : हम भी किसीसे कम नही! म्हणत वाजे विद्यालयातील पोरं निघाले अमेरिकेला...

3 students of Waje School get scholarship to study in america nashik news
3 students of Waje School get scholarship to study in america nashik newsesakal
Updated on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Success Story : परदेशात जाण्याचा मान हा इंग्रजी विभागातील विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी, डॉक्टर शाखेतील विद्यार्थ्यांना असतो असा समज अनेकांचा झालेला असून अनेक पालक हे अतिशय दर्जेदार शाळेत आपल्या पाल्याला शिक्षणासाठी प्रवेश घेतात कारण आपला पाल्य हा इंग्रजी विषयाचे उच्च शिक्षण घेऊन बाहेर देशात जाईल ही गोष्ट प्रत्येक पालकाच्या मनात घोंगावत असते. (3 students of Waje School get scholarship to study in america nashik news)

या गोष्टीला छेद देत सिन्नर तालुक्यातील मविप्र समाज संस्थेतील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे या ज्ञान संकुलातील विद्यार्थ्यांनी एक वर्षासाठी अमेरिकेत शिक्षणासोबत कुटुंबात राहण्याची अनोखी गोष्ट केली.

हम भी किसीसे कम नही यानुसार वेदश्री दीपक थापा, सृष्टी मनोहर कासार, सारंग बबन पानसरे या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड अमेरिकेत स्कॉलरशिपसाठी वर्षभर अनेक टप्पे पार करून झाल्याने त्यांचे अभिनंदन अनेक स्तरावर होत आहे.

जिल्ह्यातील एकाच वेळी जाणारे हे तीन विद्यार्थी असल्याने अतिशय होतकरू व गरीब कुटुंबातील आहे. सर्वांना त्यांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत असून यामध्ये शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक व संस्थेतील सर्व पदाधिकारी कुटुंबातील सर्व सदस्यांची मोलाची साथ या विद्यार्थ्यांना लाभली आहे.

अतिशय कमी वयात जर आपल्याला बाहेर देशात जाण्याची संधी मिळाली तर अनेकांना ते एक दिव्य स्वप्नच वाटते. पण खऱ्या अर्थाने स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम या तिन्ही विद्यार्थ्यांनी केल्याने संस्थेचे नाव उंच शिखरावर नेऊन संस्थेच्या शिरेपेचात मानाचा तोरा रोवला आहे.

ब्युरो अमेरिका येथे आयोजित केनेरी लुगर युवा विनयमय आणि पाठ्यक्रम स्पर्धेत लोकनेते शंकरराव बालाजी वाजे इयत्ता दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुमारी वेदश्री दीपक थापा ,सृष्टी मनोहर कासार, सारंग बबन पानसरे यांनी वर्षभरात वेगवेगळ्या स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत भाग घेत मोठे यश मिळवले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

3 students of Waje School get scholarship to study in america nashik news
PSI Success Story : तिळवणच्या ‘सोनाली’ची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी!

या स्पर्धेत पूर्व भारतातून ४० विद्यार्थ्यांची निवड केली जाते पण सिन्नर तालुक्यातून प्रथमता तीन विद्यार्थ्यांची निवड झाल्याने ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे.

हे विद्यार्थी अमेरिकेतील एका कुटुंबामध्ये वर्षभर राहणार असून एक वर्षाचे शिक्षण घेऊन परत भारतात येणार आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च युस डिपार्टमेंट ऑफ स्टेट अमेरिका करणार आहे. ऄ एफ एस अंतर सांस्कृतिक विनिमय कार्यक्रम या अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जगामध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी १४ ते साडे १७ या वयोगटातील विद्यार्थ्यांची निवड ही एनजीओ करीत असते. हे भारताचे युथ अँबेसिटर म्हणून काम करणार आहेत.

या विद्यार्थ्यांना मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सभापती, चिटणीस सर्व पदाधिकारी व शिक्षणाधिकारी तसेच सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत, संस्थेचे शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्कर ढोके, मुख्याध्यापक खंडेराव वारु'गसे, उप मुख्याधपक कमल रहाने, पर्यवेक्षक शरद शेळके, बाळासाहेब देशमुख, नाशिक शहराचे स्वयंसेवक जीवन शिंदे, प्रमोद कांगुणे, संतोष गायकवाड, शिक्षिका योगिता शिंदे (मोरे), आढाव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

3 students of Waje School get scholarship to study in america nashik news
Business Success Story: काच कापण्याचं काम करणाऱ्या मुलीने उभारला ४० हजार कोटींचा व्यवसाय

वेदश्री थापा विद्यार्थ्यांची निवड व कुटुंबांची आनंदाश्रू बरोबरच दुःखाचे डोंगर दरवाजावर उभे राहिले........

वेदिका दीपक थापा ही विद्यार्थिनीचे सर्व शिक्षण सिन्नर शहरात अभिनव बालविकास मंदिर सिन्नर व वाजे विद्यालय येथे झालेले असून सुमारे 25 ते 30 वर्षांपासून तिचे आई-वडील सिन्नर शहरातील नामांकित उद्योजक पुंजाभाऊ सांगळे व युवा नेते उदय सांगळे यांच्या घरी ते काम करतात.

पण अतिशय गरीब कुटुंबातून असूनही वेदश्रीने आपल्या अभ्यासाच्या जोरावर अमेरिकेत भरारी घेतली ही वार्ता जेव्हा आई-वडिलांना समजली त्यावेळेस त्यांना आनंद अश्रू लपले नाहीत . व सांगळे कुटुंब यांनाही खूप आनंद झाला पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. यावेळेस वेदश्री चे वडील दीपक यांना एका आजाराने ग्रासलेचे डॉक्टरांच्या रिपोर्ट मध्ये आले.

एकीकडे सुखद घटना घडत असताना दुसरीकडे दुःख दरवाजापुढे येऊन थांबले होते. आई आशा यांनी कोणतीही हार न मानता पती दीपक यांना साथ देत योग्य उपचार वेळीच केल्याने त्यांना या आजारातून बरे होण्यास लवकर मदत मिळाली. यासाठी सांगळे कुटुंबीय उद्योजक पुंजाभाऊ सांगळे व युवा नेते उदय सांगळे यांनी थापा कुटुंबियांची काळजी घेत.

3 students of Waje School get scholarship to study in america nashik news
Success Story: एरोस्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी नीलेश गायकवाड; बागलाणच्या शिरपेचात रोवला गेला मानाचा तुरा

अतिशय दर्जेदार दवाखान्यात त्यांचावर उपचार करून त्यांना या दुःखाच्या डोंगरातून बाहेर काढले .यासाठी सांगळे कुटुंब यांचे हे सामाजिक काम दिसून आले. कोणत्याही नावाचा गवगवा न करता त्यांनी वेदश्री ला मदत करीत . तिच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाचे क्षण आणले.

अशी सामाजिक बांधिलकी राखत सांगळे कुटुंबियांनी एक अनोखे उदाहरण समाजाला दिले आहे. सांगळे कुटुंब सामाजिक राजकीय सांस्कृतिक अनेक क्षेत्रात अग्रेसन असून त्यांनी केलेल्या या कामाची कोणतीही प्रसिद्धी न करण्याचे ठरवले होते. पण चांगल्या कामाची दखल घेणे हे वृत्तपत्राचे काम असल्याने त्यांचे हे काम अतिशय वाखण्याजोगेचे आहेत.

"मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात. विद्यार्थीही व शिक्षक हे दोन्हीही योग्य ते शिक्षण घेत आज संस्थेचे नाव अनेक देशांमध्ये नेत असून लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी शाळेचे तसेच कुटुंब यांचे नाव उंच नेले आहे. प्रथमता तिन्ही विद्यार्थ्यांनी अमेरिकेत गगन भरारी घेतल्याने वाजे विद्यालयाचे नाव आज जगभरात गाजले आहे व एक संस्थेच्या शिरेपेच्यात मानाचा तोरा यांच्या अभ्यासाने खोवला आहे." - कृष्णाजी गणपत भगत, मविप्र संचालक सिन्नर

3 students of Waje School get scholarship to study in america nashik news
MPSC Success Story : एमपीएससीत सचिनचे दुहेरी यश! बेताच्या स्थितीवर मात करत गवसणी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.