Nashik Crime: तब्बल 17 लाखाचा माल परस्पर विकणाऱ्या 3 संशयितांना बेड्या

crime
crimeesakal
Updated on

Nashik Crime : आडगाव शिवारातील परफेक्ट डाळिंब मार्केट येथून गुवाहाटीला पोचविण्यासाठी दिलेला १७ लाख २४ हजार रुपयांचा डाळिंब व सूर्यावुड कंपनीच्या गॅस शेगड्या गुवाहाटीला न पोचविता परस्पर विक्री केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहे.

संशयितांकडून आयशर वाहनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (3 suspects who sold goods worth 17 lakh to each other handcuffed Nashik Crime)

जून महिन्यात छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या डाळिंब मार्केटमधील जय माता दि. ट्रान्स्पोर्ट येथे सदर घटना घडली होती. गुजरात (वापी) राहणारे संशयित अंकित शेंगर व अरमान खान हे दोघे २८ जूनला जय माता दि. ट्रान्स्पोर्ट येथे आले.

गाडीला भाडे आहे का, अशी विचारणा करून ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक कैलास जाधव, सरताज खान यांनी गुवाहाटीला डाळिंब व गॅस शेगड्या पोचविण्यासाठी गाडी ठरवली. वाहनात एक हजार २२ डाळिंब भरलेले क्रेट, २०० गॅस शेगड्या भरल्या. रस्त्यात डिझेल व टोलसाठी ३० हजार रुपये देत माल रवाना केला.

मात्र तीन ते चार दिवसानंतर गाडी इच्छित स्थळी न पोचल्याने सरताज यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून शेंगर आणि राहुल यादव यांच्यावर तक्रार दाखल केली होती.

वरिष्ठ निरीक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक अशोक पाथरे, पप्पू वाघ, विलास चारोस्कर, नीलेश काटकर हे गुजरात राज्यात संशयितांच्या शोधार्थ रवाना झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime
Nandurbar Crime News : धूमस्टाईल महिलांची चेन लांबविणाऱ्या टोळीला अटक

त्याच दरम्यान ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक जाधव व खान यांनी गाडी लोकेशन तपासले असता, गाडी धरमपूर वलसाड रस्त्यावर उभी असल्याचे दिसले. जाधव यांनी थेट धरमपूर गाठले. शेंगर व यादव त्या ठिकाणी मिळून आले तर गाडी परिसरात बेवारस आढळली.

दोघांना विचारणा केली असता, त्यांनी गाडी लुटल्याचा बनाव केला. मात्र, संशय बळावल्याने ट्रान्स्पोर्ट चालकांनी शेंगर व यादव यांना थेट आडगाव पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले.

त्यानंतर चौकशीत सदर घडला प्रकार उघड झाल्याने गुजरात राज्यात तपासकामी गेलेल्या गुन्हा शोध पथकाने एक दिवस तळ ठोकून नवाज सय्यदला ताब्यात घेत पोलिस ठाणे गाठले, तर अरमान खान पसार झाला.

crime
Nashik Crime: मुदतबाह्य 13 लाखांच्या बियाण्यांवर ‘कृषी’ची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.