Nashik BJP NAMO Marathon : नमो मॅरेथॉनमध्ये 3 हजार स्पर्धकांचा सहभाग

भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून रविवारी (ता.११) नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ या मार्गावर नमो मॅरेथॉन स्पर्धा झाली.
BJP officials and organizers distributing prizes to the winners of Namo Marathon. In the second photo, the contestants participating in the marathon.
BJP officials and organizers distributing prizes to the winners of Namo Marathon. In the second photo, the contestants participating in the marathon.esakal
Updated on

Nashik BJP NAMO Marathon : भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून रविवारी (ता.११) नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ या मार्गावर नमो मॅरेथॉन स्पर्धा झाली.

या मॅरेथॉनमध्ये तीन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये पुरुष व महिला असे वेगळे गट केले होते. (3 thousand contestants participated in Namo Marathon nashik news)

मॅरेथॉनची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व व्यासपीठावर गणेश वंदना घेत झाली. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते झेंडा दाखवून व फुगे सोडले.

व्यासपीठावर ज्येष्ठ नेते अरुण पवार, माजी महापौर रंजना भानसी, नमो चषकचे संयोजक अमित घुगे, माजी नगरसेवक उद्धव निमसे, प्रियंका माने, राजेंद्र निकम, अशोक दुधारे, सागर शेलार, प्रवीण भाटे, प्रशांत वाघ, राहुल कुलकर्णी, धनंजय माने, राहुल पवार, सोमनाथ वडजे, राजू थोरात, ज्ञानेश्वर काकड, एकनाथ पगार, रोहिणी दळवी, मंगला शिंदे, अनिता सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी झुम्बा व नृत्य करण्यात आले.

BJP officials and organizers distributing prizes to the winners of Namo Marathon. In the second photo, the contestants participating in the marathon.
Nashik MVP Marathon : रविवारी नाशिक मविप्र मॅरेथॉन; नाशिककरांना सहभागाचे आवाहन

सर्व गटात प्रथम १११११, द्वितीय ७७७७, तृतीय ५५५५ रोख बक्षीसे दिली. तसेच ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह अशी उत्तेजनार्थ बक्षीस दिली. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप झाले. ५ व १० किमी स्पर्धेचा मार्ग होता. मॅरेथॉनसाठी दीपक निकम, आनंद चकोर, सतीश बोरा, शैलेश रकिबे, कुणाल अहिरे, शशीभूषण सिंग, अविनाश वाघ, ऋषिकेश रसाळ, अंकुश सिंग आदींनी परिश्रम घेतले.

गटनिहाय विजेते खालीलप्रमाणे

१६ वर्षांखालील मुले :गोविंद पाडेकर, महेश राजपूत. मुली : स्वप्नीला चौधरी, वैष्णवी आहेर.

खुला गट १६ ते ४० पुरुष प्रथम-सुजय भामरे, द्वितीय-महेंद्र महाजन, तृतीय-गोविंद रंगे, चतुर्थ-आकाश गावडे, पाचवे-कुणाल रामोशी, महिला : प्रथम-फश्या लोभी, द्वितीय-साक्षी कसबे, तृतीय-ममता भोये.

४० वर्षां पुढील पुरुष : प्रथम-सावळीराम शिंदे, द्वितीय-अशोक पवार, तृतीय-रामदास गडाख. महिला : प्रथम-सृष्टी शिंदे, द्वितीय-अर्चना पाटील, तृतीय-वर्षा मुळाणे. ६० वर्षांपुढीलही गट केला होता.

BJP officials and organizers distributing prizes to the winners of Namo Marathon. In the second photo, the contestants participating in the marathon.
Nashik BJP NAMO Marathon: रविवारी ‘नमो मॅरेथॉन’! येथे करा नोंदणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.