Nashik News : स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेकदा प्लॅस्टिकच्या माध्यमातून तयार केलेल्या राष्ट्रीय ध्वजाचा वापर केला जातो. स्वातंत्र्य दिनानंतर अनेक ठिकाणी तिरंगा झेंडा रस्त्याच्या कडेला अथवा वेगवेगळ्या ठिकाणी पडलेला दिसतो.
राष्ट्रीय ध्वजाचा मान राखला जावा आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धनही होण्याच्या उद्देशाने नाशिकच्या आदित्य खेडकर या विद्यार्थ्याने क्रोशा आर्टच्या माध्यमातून ३० बाय ४५ इंच आकाराचा राष्ट्रीय ध्वज तयार केला आहे. (30 by 45 inch woolen national flag created by Aditya Khedekar through Krosha Art nashik news)
मुख्य म्हणजे आदित्य हा भारतातला कमी वयाचा क्रोशा आर्टिस्ट असून आणि क्रोशाचा पहिलाच ध्वज बनला आहे.
क्रोशा आर्ट अनेकदा महिला अथवा मुलींसाठी असलेली म्हणून ओळखली जाते. मात्र, आदित्यने कलेच्या माध्यमातून ३२ तासांच्या कालावधीत राष्ट्रीय ध्वज तयार करत स्त्री- पुरुष समानतेचाही संदेश दिला आहे. विशेष म्हणजे लवकरच त्याच्या प्रयोगाची एशिया बुक रेकॉर्ड तसेच विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.
आदित्य इस्पॅलिअर स्कूलचा विद्यार्थी असून, त्याला शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्याकडून मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. आदित्य खेडकर याने सांगितले, की क्रोशा कला तंत्राचा वापर करून तयार केलेला पहिला लोकरीचा भारतीय ध्वज आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलेल्या स्वावलंबनाच्या तत्त्वांबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने ध्वजाची निर्मिती करण्यात आली आहे. क्रोशा कला प्रत्येकासाठी सर्वसमावेशक आहे. त्यामुळे स्त्री- पुरुष समानतेबरोबरच सामाजिक मानसिकता बदलण्यास चालना मिळू शकेल.
असा आहे राष्ट्रीय ध्वज
कला- क्रोशा आर्टद्वारे लोकरीने बनलेला भारतीय ध्वज
वापरलेले साहित्य- लोकरचे चार रंग
ध्वजाचा आकार- ३० बाय ४५ इंच
निर्मितीचे उद्दिष्ट- प्लॅस्टिक ध्वजाचा कमी वापर करून जागरूकता निर्माण करणे,
पर्यावरणास अनुकूल ध्वजांच्या वापरास प्रोत्साहन देणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.