Crop Fire Incident : शॉर्ट सर्किटमुळे 30 क्विंटल मका खाक; 3 ट्रॉली चारा खाक

Maize grains and fodder in the field burnt in fire caused by short circuit
Maize grains and fodder in the field burnt in fire caused by short circuitesakal
Updated on

देवळा (जि. नाशिक) : वाजगाव (ता. देवळा) येथील संदीप रमेश देवरे यांच्या शेतावरील वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत शेतातील ३० क्विंटल मक्याची कणसे, तसेच तीन ट्रॉली चारा खाक झाला. यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे ४२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. (30 quintals of maize burned due to short circuit at vajgaon Nashik News)

वाजगाव- वडाळे रस्त्यावर राहणारे शेतकरी संदीप देवरे यांनी त्यांच्या ३२ गुंठे क्षेत्रात (गट क्रमांक ५६४) असलेल्या मका कापणीचा मक्ता गावातील मजुरांना दहा हजार रुपयांना दिला होता. मजुरांनी सोमवारी (ता. ३१) शेतातील मका कापणी केली होती. खुडलेली मक्याची कणसे शेतातच पडली होती. या शेतावरून वीज कंपनीच्या वीजवाहक तारा गेलेल्या होत्या.

बुधवारी (ता. २) सकाळी साडेनऊला लोडशेडींगच्या वेळापत्रकानुसार वीज आली व लोंबकळणाऱ्या तारांवर बसलेले पक्षी उडाल्यामुळे तारांना हेलकावा बसून शॉर्टसर्किट झाले व ठिणग्या उडून त्यातून शेतात पसरलेल्या मक्याच्या चाऱ्याने पेट घेतला. आग लागल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, शेतात पसरलेल्या सर्व चाऱ्यानेच पेट घेतल्यामुळे आग विझविणे अशक्य झाले. यामुळे सर्व चारा व मक्याची कणसे जळून खाक झाली.

Maize grains and fodder in the field burnt in fire caused by short circuit
Sakal Sting Operation : ‘शिवशाही’चा प्रवास ठरतो जिवाशी खेळ

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक अभियंता जितेंद्र देवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेताला भेट देऊन पाहणी केली, तसेच या घटनेबाबत वीज अभियंत्यांना कळविण्यात आले असल्याची माहिती श्री. देवरे यांनी दिली. तलाठी कुलदीप नरवडे यांनी पीक नुकसानीचा पंचनामा केला आहे. संदीप देवरे यांनी वीज कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

लोंबकळणाऱ्या तारांमुळे दरवर्षी शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. वीज कंपनीने या सदोष तारांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Maize grains and fodder in the field burnt in fire caused by short circuit
Nashik : पाषाण मंदिरांना संवर्धनाची आस!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.