Nashik Corona Update : व्हॅरीयंटची तपासणीसाठी 30 नमुने पुण्याला रवाना

Nashik Corona Update
Nashik Corona Updateesakal
Updated on

Nashik Corona Update : राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार लोकांना काळजी घेण्याचे मास्क वापरण्याचे आवाहन करीत आहे. कोरोनाचे नवीन रुग्ण दाखल होत असले तरी ते सौम्य बाधित रूग्ण सापडत असून अद्याप कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासलेली नाही.

मात्र, दक्षता म्हणून जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून व्हॅरीयंटची तपासणी करण्यासाठी ३० नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. येत्या २-३ दिवसात त्यांचे अहवाल मिळण्याची शक्यता आहे. (30 samples sent to Pune for testing the variant Nashik Corona Update news)

काही दिवसांपासून कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत आहे. यावर, केंद्र व राज्य सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या बाबत बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देखील केली असून राज्यांना अन राज्याने प्रत्येक जिल्ह्याला मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

मास्क सक्ती करण्याबाबत राज्य शासनांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने मास्क वापरण्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. कोरोना वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा (प्रिव्हेन्शन) डोस किंवा दुसरा डोस घेण्यासही नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर जात आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Nashik Corona Update
Corona Updates : बीएमसी कार्यालयात उद्यापासून मास्कसक्ती; आयुक्त इक्बाल चहल यांचा निर्णय

मात्र जिल्ह्यात लसींचा तुटवडा आहे. लसींचा तुटवडा असल्याने लसींची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रावर चाचण्या वाढविण्यात आल्या असल्या तरी त्या प्रमाणात गत एक-दोन दिवसात तरी रुग्णवाढ झालेली नाही.

मात्र, आरोग्य विभागाकडून तयारी केली जात असल्याचे डॉ. नेहेते यांनी सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ५१ लाख ५६ हजार १०३ लोकांनी अर्थात ९० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला तर ४५ लाख ८२ हजार २०० लोकांनी अर्थात सुमारे ८२ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

सावधगिरीचा (प्रिव्हेन्टीव्ह) डोसचे प्रमाण मात्र ५ लाख ५० हजार १३६ अर्थात १० टक्क्यांपेक्षा कमी जणांनी डोस घेतला आहे.

Nashik Corona Update
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रिटर्न! दिवसभरात आढळले 'इतके' रुग्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()