Nashik News : मोसम नदीतून काढला 30 टन कचरा; स्वच्छता मोहीम महिन्यात दोनवेळा राबवणार

शहरात सलग दुसऱ्यांदा मोसम नदीपात्रात शनिवारी (ता. ३) विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
Sanitation workers of the Municipality removing garbage under a special cleanliness campaign in Mosam riverbed here
Sanitation workers of the Municipality removing garbage under a special cleanliness campaign in Mosam riverbed hereesakal
Updated on

Nashik News : शहरात सलग दुसऱ्यांदा मोसम नदीपात्रात शनिवारी (ता. ३) विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ६० कर्मचारी प्रत्येकी दोन जेसीबी, टिप्पर, ट्रॅक्टर व चार घंटागाडींच्या माध्यमातून ३० टन कचरा काढण्यात आला. (30 tons of garbage removed from Mousam river nashik news)

यापूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मोसम नदीपात्रात सामान्य रुग्णालय पूल ते सांडवा पुलापर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत ८५ टन कचरा काढल्याने या भागातील नदीचे रुपडे पालटले आहे. आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी स्वच्छता विभागास दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी नदी स्वच्छता करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

Sanitation workers of the Municipality removing garbage under a special cleanliness campaign in Mosam riverbed here
Nashik News : शिक्षक सतीष पैठणकरांनी परत केले 80 हजार रुपये

आयुक्तांच्या आदेशानुसार आज श्री. जाधव, अतिरिक्त आयुक्त राजेद्र फातले, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकबाल जान मोहम्मद यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सात ते दुपारी दोन या दरम्यान प्रत्येक वॉर्डातील १५ याप्रमाणे ६० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी सांडवा पूल ते नुमानी पुलापर्यंत विशेष मोहीम राबविली.

मोहिमेसाठी वाहन विभागाने जेसीबी, टिप्पर, ट्रॅक्टर, घंटागाडी उपलब्ध करून दिल्या होत्या. या मोहिमेत नदीपात्रातून ३० टन कचरा काढण्यात आला. नियमित मोहीम राबविल्यास मोसम नदी स्वच्छता राहण्यास मदत होणार आहे. या मोहिमेत प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंदसिंग पाटील, सुनील गंगावणे, आकाश केदारे, कपिल परदेशी, मनीष कापडे आदींसह निरीक्षक, वॉर्ड स्वच्छता निरीक्षक, संबंधित वॉर्ड मुकादम व कर्मचारी सहभागी झाले होते.

Sanitation workers of the Municipality removing garbage under a special cleanliness campaign in Mosam riverbed here
Nashik News : मखमलाबाद परिसरात अघोषित भारनियमन; रहिवाशांमध्ये असंतोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.